आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुशर्रफ यांच्या हत्येसाठी एक अब्जाची सुपारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये आज सरकारच्या भविष्याचा निर्णय होणार आहे. तर दुसरीकडे जम्हूरी वतन पार्टीने (जेडब्ल्यूपी) ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग (एपीएमएल)चे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना त्या फतव्याची आठवण करुन दिली आहे की ज्यात ३६ उलेमांनी (मुस्लिम धर्मगुरु) हत्या करण्यासाठी मुशर्रफ ही एकदम योग्य व्यक्ती असल्याचे म्हटले होते.
मारुन टाकलेला बलूच नेता अकबर खान बुगतीचा मुलगा आणि जेडब्ल्यूपीचा अध्यक्ष तलाल अकबर बुगती यांनी म्हटले आहे की, या फतव्याची जो कोणी अंमलबजावणी करेल तो आमचा हिरो असेल. अकबर खान बुगती यांची हत्या व लाल मस्जिद येथील निरपराध (?) लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मुशर्रफ यांना उलेमा-ए-इकरमने हत्येसाठी योग्य व्यक्ती असल्याचे घोषित केले होते.
मुशर्रफ यांची पाकिस्तानमध्ये परतण्याची इच्छा आहे, त्याबाबत तलाल यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, त्यांच्यासाठी आम्ही केव्हाच फतवा काढला आहे. या फतव्याची जो अंमलबजावणी करेल तो आमचा हिरोच असेल पण त्याला बक्षीस म्हणून १ अब्ज ( १०० कोटी रुपये) मिळतील.
तलाल यांनी पुढे सांगितले की, जर उर्दु बोलणा-या कोणत्याही व्यक्तीने किंवा सैनिकाने मुशर्रफ यांची हत्या केली तर, त्या व्यक्तीला ७२ तासाच्या आत क्वोटा शहरात १० कोटी रुपयांचा व्यावसायिक प्लॉट दिला जाईल.
जम्हुरियत की हुकूमत? आज फैसला होण्याची शक्यता
झरदारी-कयानी यांच्यात पॅचअप? तणाव निवळणार
राष्ट्राध्यक्ष झरदारी यांची फाइल स्वत:चाच पक्ष उघडणार!