आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इस्लामाबाद- सौदी अरेबियाच्या अधिका-यांनी माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना पाकिस्तानला जाऊ नका, असा सल्ला दिला आहे. मायदेशात जाणे प्राणघातक ठरू शकते, असा इशाराही सौदीने दिला आहे. ही माहिती ‘द न्यूज’ने मुशर्रफ यांच्यासोबत परतणा-या प्रतिनिधीच्या हवाल्याने दिली आहे. मुशर्रफ यांनी 24 मार्चला पाकिस्तानात परतण्याची घोषणा केली आहे. त्यांचा पक्ष ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल) 11 मे रोजी होणा-या सार्वत्रिक निवडणुकीत उतरणार आहे. सौदी अरेबियाच्या गुप्तहेरांनी मुशर्रफ यांना दुबईमध्ये धोक्याची सविस्तर माहितीदेखील दिली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.