आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslim Women Will Have To Open Veil For Identification

ऑस्‍ट्रेलियात ओळख सिद्ध करण्यासाठी मुस्लिम महिलांना बुरखा काढावा लागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- ऑस्ट्रेलियात यापुढे मुस्लिम महिलांना आपली ओळख सिद्ध करण्यासाठी बुरखा काढावा लागणार आहे. देशाच्या नवीन कायद्यानुसार ही बाब बंधनकारक करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने गुरुवारी ओळख सिद्ध करण्यासंबंधीच्या नवीन कायद्याला मंजुरी दिली. त्याविषयी मुस्लिम व शीख समुदायाशी चर्चा करण्यात आली होती. त्या अगोदर एक अध्यादेश काढण्यात आला होता. त्यात पोलिसांना ओळख सिद्ध करण्यासाठी पगडी बाजूला करण्याचा अधिकार देण्यात आला होता.

विधेयकातील समुदायसूचक शब्दांना मुस्लिम व शीख समुदायाकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्याला स्वीकारून सरकारने विशिष्ट शब्द वगळण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे नवीन कायद्याचा मसुदा तयार होऊ शकला. नवीन कायद्यानुसार संशयित व्यक्तीचे डीएनए नमुने घेण्याची परवानगीही पोलिसांना देण्यात आली आहे. त्याचबरोबर दात, केसाचे नमुने देखील गोळा करणे शक्य होणार आहे.

दरम्यान, एका खटल्यात कार्निटा मॅथ्यूज नावाच्या महिलेने बुरखा परिधान करून खोटा जबाब दिल्याचे उघड झाले होते. जनतेमध्ये त्यावरून असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर तिला सहा महिन्यांची शिक्षा झाली होती. नंतर तिची सुटका झाली होती.