आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Muslims Still Fear Persecution In Gujarat Us Report

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातमधील मुस्लिम आजही भीतीच्या सावटाखाली - अमेरिकेचा अहवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अहवालात म्हटले आहे की, गुजरातमध्ये मुस्लिमांना आजही त्यांच्या हिंदू शेजा-यांची भीती वाटत आहे. आतंरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासंबंधीच्या या अहवालात भारतातील धार्मिक स्वांतत्र्याची स्तूती करण्यात आली असली तरी, गुजरात दंगलीसाठी जे जबाबदार आहेत त्यांना अजूनही शिक्षा झालेली नाही याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गुजरात दंगलीची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्यामुळेच गुजरातमधील मुस्लिम भीतीच्या सावटाखाली आहेत, असे अहवालात म्हटले आहे.
भाजपने हिंदूत्वाचा अजेंडा सोडला नसल्याचाही अहवालात उल्लेख आहे. केंद्रातील काँग्रेस प्रणित युपीए सरकारने हिंदूत्वाचा मुद्दा बाजूला सारला असला तरी, भाजपची सत्ता असलेल्या राज्यात अजूनही याच विचारधारेचा प्रभाव आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानूसार गुजरात दंगलीसाठी जबाबदार असलेल्यांना जेरबंद करण्यात राज्य सरकार अपयशी ठरली आहे. यामुळे तेथील सामाजिक कार्यकर्ते चिंतीत असल्याचे म्हटले आहे.
२००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीत १२०० हून अधिक लोक मारले गेले, त्यातील बहुतेक मुसलमान होते.
गुजरात दंगल : दीपडा दरवाजा प्रकरणात २२ जणांना जन्मठेप
गुजरात दंगलीप्रकरणी दोषी आढळल्यास भरचौकात फाशी द्या : नरेंद्र मोदी
गुजरात दंगलीत नुकसान झालेल्या धार्मिक स्थळांचा तपशील द्यावा- सुप्रीम कोर्ट
दंगलींनंतर वाजपेयींनी कलाम यांना गुजरात दौ-यापासून रोखले होते