आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रागाच्या भरात त्याने बायकोचे नाकच कापले !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - नाक आणि प्रतिष्ठा यांचा जुना संबंध, परंतु आपल्या पतीनेच पत्नीचे खरोखरचे नाक कापावे. त्यानंतर बत्तीस वर्षे त्याच अवस्थेत नरकयातना भोगण्याची वेळ एका महिलेवर यावी. अशीच घटना पाकिस्तानात घडली आहे.
अल्लाह रखी असे या दुर्दैवी महिलेचे नाव. नाक कापल्यानंतर तिला बत्तीस वर्षे चेहरा लपवून जगावे लागले. त्यांना आजही तो दिवस आठवतो. पंजाबमधील एका शेतातून ही दोन मुलांची आई जीवाच्या आकांताने धावत होती. तिचा पती गुलाम अब्बासने तिला पुन्हा मारहाण केली होती. अल्लाह रखी थट्टा पीर गावाजवळ पोहोचणारच होती. एवढ्यात तिच्या पतीने तिला पकडले. काही मिनिटांतच जमीन लाल झाली होती. गुलामने तिचे नाक कापले होते. ती सांगते, त्याने मला पकडले. म्हणाला माझे ऐक. मी म्हणाले, मार खाऊन-खाऊन मी वैतागले आहे. आता माझ्या आई-वडिलांकडे चालले आहे. मग त्याने मला खाली पाडले. माझ्या छातीवर बसला आणि खिशातून ब्लेड काढले पहिल्यांदा त्याने माझे नाक कापले. सगळे रक्त माझ्या डोळ्यात गेले होते. मग मला पळून जाता येऊ नये म्हणून त्याने माझ्या टाचांवर वार केले. तिने पोलिसांत तक्रार करू नये म्हणून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अल्लाह रखीला घरी आणण्यात आले.
अनेक वर्षे आपण चेहरा कपड्यात लपवून जीवन जगलो, असे ती सांगते. बुरखा व कपड्यात लपवून आपण 32 वर्षे काढली. स्वत:लाच पाहणे देखील चांगले वाटत नव्हते. या काळात मला विवाह किंवा एखाद्या समारंभात जाता येत नव्हते. एखाद्या लहान मुलाने मला पाहिले तर ते घाबरून जात. मी स्वत:ला मृतदेह समजत होते, असे हकिकत अल्लाह रखी बीबीसीच्या वृत्तात सांगितली आहे, परंतु आता मात्र ती स्कार्फ वापरत असली तरी चेहरा लपवण्याची गरज भासत नाही. शस्त्रक्रिया करून नाक बसवण्यात आले आहे. ती आजी बनली आहे. ती हसते. पण तिच्या चेह-यावर कापल्याचे लांब व्रण आहेत. ही खूण तिच्या नाकापासून माथ्यापर्यंत गेल्याचे दिसते. पाकिस्तानातील प्रसिद्ध डॉक्टर प्रोफेसर हामीद हसन यांनी तिच्यावर मार्चमध्ये शस्त्रक्रिया केली. त्यानंतर तिचे शारीरिक घाव व मानहानी कमी होत आहे. सगळे काही विसरून ती पुन्हा अत्याचार करणारे गुलाम अब्बास यांच्यासोबतच राहत आहे.
जे घडले त्यामागे काही कारण आहे. विनाकारण हे घडलेले नाही, असे गुलाम अब्बास यांनी सांगितले, परंतु नेमका कोणता अपराध अल्लाह रखी यांच्याकडून झाला, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. दुसरीकडे अल्लाह रखी म्हणते, पतीसाठी मी कधीही शिक्षा मागितली नाही. ही गोष्ट अल्लाहवर सोडून दिली. मी यावे असे मुलगा अजहरला वाटत होते. शिवाय नातवंडांना बघावे वाटले. म्हणून आले. नातवंडांना बघून सगळे विसरून जाते.
शिक्षा व घटस्फोट - हे प्रकरण नंतर पोलिसात गेले. गुलाम अब्बासला नंतर अटक झाली. त्यानंतर तो सहा महिने तुरुंगातही राहिला. मात्र, नंतर अल्लाह रखीने आपल्या दोन मुलांसाठी गुलामला तुरुंगातून सोडवून आणले, परंतु कैदेतून सुटल्यानंतर गुलामने तिला तलाक दिला. त्यानंतर सुरू झाल्या तिच्या नरकयातना. तिला एका बंद खोलीत जीवन जगावे लागले. येथे तिचा आरसा हा सर्वात मोठा शत्रू होता. चेहरा लपवून ती राहू लागली. नाक कापण्यापेक्षा माझा गळा कापला असता तर बरे झाले असते, असे ती आपल्या मुलांना म्हणत असे.
पाच बायकांचा मत्‍सर उठला जीवावर, बलात्‍कार करुन घेतले नव-याचे प्राण