आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश महिलेची आपबीती, \'पतीनेच केला 300 वेळा बलात्‍कार, बनविली अश्लील टेप\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - एका ब्रिटिश महिलेने धक्‍कादायक खुलासा केला आहे. तिच्‍या पतीनेच तिच्‍यावर 300 वेळा बलात्‍कार केला. सोबतच या भयंकर कृत्‍याच्‍या त्‍याने चित्रफितीही बनविल्‍या आहेत. पीडित महिलेच नाव सारा टेटली (वय 28) असून ती लीसेस्‍टरशायरमधील मेल्टन मॉउब्रेची रहिवासी आहे.
साराने याबद्दल पोलिसात तक्रार दिली असता पती चार्ली ला 12 वर्षांची शिक्षा झाली. चार्लीच्‍या संगणकामधून पोलिसांनी 316 अश्‍लील व्हिडिओ टेप जमा केले.
सारा आणि तिचा पती चार्ली टेटली यांचा 2011 मध्‍ये प्रेमविवाह झाला होता. तेव्‍हा सारा 18 वर्षांची होती. अगदी परींच्‍या कथेप्रमाणे तिचे आयुष्‍य होते. त्‍यांना एक अपत्‍यही झाले. परंतु अचानक त्‍यांच्‍या आयुष्‍याला वेगळे वळण मिळाले. चार्ली गुंगीचे औषध देऊन तिच्‍यावर दररोज बलात्‍कार करत होता. शिवाय त्‍याचा VIDEO सुध्‍दा बनवत होता.
यामूळे जाहीर आली आपबीती
महिलांवर होत असलेल्‍या वाढत्‍या अन्‍यायाला वाचा फोडण्यासाठी, महिलांनी निर्भयपणे अन्‍यायाविरुध्‍द आवाज उठविण्‍यासाठी साराने आपली आपबीती कथन केली. महिलांनी अन्‍यायी प्रवृत्‍तीविरुध्‍द विद्रोह करण्‍यासाठी साराने तिची आपबीती सांगितली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रे...