आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सू की यांच्या संसदीय कारकीर्दीस प्रारंभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाएप्यीडो (म्यानमार)- म्यानमारच्या विरोधी पक्ष नेत्या आंग सान सू की यांनी आपल्या ऐतिहासिक संसदीय कारकीर्दीला सोमवारी प्रारंभ केला. लष्कराच्या मगरमिठीत असलेल्या म्यानमारमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी गेले पाव शतक सुरू असलेल्या त्यांच्या लढ्यातील हा महत्त्वाचा टप्पा आहे.
लष्करी सत्तेपुढे मान न तुकवता केलेल्या संघर्षामुळे त्यांना दीर्घकाळ तुरुंगवास सोसावा लागला. त्यांना नोबेल पुरस्कारही मिळाला. निवडून आलेले नेतृत्व म्हणून संसदेत आपल्या जागेवर जाताना त्यांचा चेहरा शांत होता. देशासाठी मी सर्वशक्तीनिशी काम करीन, असे त्या म्हणाल्या.
नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) या त्यांच्या पक्षाच्या इतर सदस्यांसह त्या कामकाजात सहभागी होत असून, एप्रिलमधील पोटनिवडणुकीने त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.
एनएलडीच्या खासदार मे विन मिंट म्हणाल्या की, सू कींच्या आगमनामुळे त्यांना अतिशय आनंद झाला असून, त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. म्यानमारच्या संसदेवर अजूनही लष्कर व त्याच्या सहकारी पक्षांचेच वर्चस्व आहे. घटनेत तरतूद करून लष्करासाठी संसदेत फक्त एक चतुर्थांश जागा ठेवण्याची एनएलडीची योजना असूनही, या ज्येष्ठ कार्यकर्तीला संसदेत पाहून लष्करी अधिकाºयांना आनंद झालेला दिसत होता. ब्रिगेडियर जनरल वै लिन म्हणाले की, त्यांचे आगमन ही चांगली गोष्ट आहे.