आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mysterious Lake Appears In The Middle Of Tunisian Desert News In Marathi

MIRACLE: कोरड्या, रखरखीत वाळवंटात तयार झाला रहस्यमय तलाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टुनिशियाच्या नागरिकांना आता आणखी एक बिच उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे हा बिच चक्क कोरड्या, रखरखीत वाळवंटात आहे. टुनिशियाच्या वाळवंटात अचानक तलाव तयार झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या तलावाच्या काठांवर अगदी बिचसारखे वातावरण तयार झाले असून दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे.
टुनिशियाच्या वाळवंटातील अगदी कोरड्या, रखरखीत भागात पाण्याने काठोकाठ भरलेला भलामोठा तलाव तयार झाला आहे. त्यावर स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अचानक तलाव कसा निर्माण झाला, याचे कोडे त्यांना सुटता सुटत नाहीये. त्यांनी याचे नामकरण केले असून 'गफसा बिच' असे नाव दिले आहे. सुमारे 2.6 एकर परिसरात हा तलाव पसरलेला आहे. तलावातील पाण्याचा सर्वांत खोल तळ सुमारे 50 फुट असल्याचे आढळून आले आहे.
या तलावातील पाण्याचा उगम अद्याप सापडलेला नसून प्रशासकीय अधिकारी या तलावाच्या निर्मिती मागचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या रहस्यमय तलावाची छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर.... व्हिडिओत बघा पर्यटकांची गर्दी...
(सौजन्य- द गार्डियन)