आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक‍ विरोधाला झुगारुन उत्तर कोरियाची अणूचाचणी?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल- जागतिक समुदायाचा विरोध झुगारुन उत्तर कोरियाने अणूचाचणी केल्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात आली आहे. उत्तर कोरियाच्‍या अणूचाचणी परिसरात 4.9 रिश्‍टर तीव्रतेचे भूकंपाचे धक्‍के नोंदविण्‍यात आले आहेत. अणूचाचणीमुळेच हे धक्‍के नोंदविण्‍यात आल्‍याची दाट शक्‍यता वर्तविण्‍यात आली आहे.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 8.27 मिनिटांनी हे धक्‍के नोंदविण्‍यात आले. सुमारे 4.9 ते 5.1 रिश्‍टरपर्यंत तीव्रता नोंदविण्‍यात आली. भूपृष्‍ठापासून केवळ 1 किलोमीटर खोल केंद्रबिंदू होता. महत्त्वाचे म्‍हणजे उत्तर कोरियाची अणूचाचणीचे स्‍थळ असलेल्‍या परिसरात धक्‍के नोंदविण्‍यात आले आहेत. दक्षिण कोरियाने यासंदर्भात सखोल माहिती काढण्‍याचे प्रयत्‍न सुरु केले आहेत. उत्तर कोरियाने अणूचाचणी केली का, यासंदर्भात अमेरिकेसह जगातील प्रमुख देशांकडून खात्री पटविण्‍याचे काम सुरु आहे.

उत्तर कोरियाकडून गेल्‍या काही दिवसांपासून अणूचाचणीची धमकी देण्‍यात येत होती. यापूर्वी 2006 आणि 2009 मध्‍ये उत्तर कोरियाने अणूचाचणी केली होती. तिस-या अणूचाचणीची खात्री पटल्‍यास हे अमेरिका तसेच चीन, जपान आणि दक्षिण कोरियासाठी मोठे आव्‍हान ठरेल.