Home »International »Pakistan» NAB Officer Probing Graft Charges Involving Pak PM Found Dead

पाक पंतप्रधान अश्रफ यांच्या घोटाळ्याची चौकशी करणा-या अधिका-याचा मृत्यू

वृत्तसंस्था | Jan 18, 2013, 20:31 PM IST

  • पाक पंतप्रधान अश्रफ यांच्या घोटाळ्याची चौकशी करणा-या अधिका-याचा मृत्यू

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या एका वरिष्ठ अधिका-याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नॅशनल अकांऊटीबिलीटी ब्यूरो (एनएबी) चे सहायक संचालक कामरान फैजल यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह इस्लामाबादच्या फेडरल लॉज मधील एका खोलीत सापडला.

पंतप्रधान अश्रफ यांच्यावर रेंटल पॉवर मधील घोटाळ्याचा आरोप आहे. या घोटाळ्याची चौकशी करत असलेल्या दोन अधिका-यांपैकी फैजल एक होते. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानांसह २० जणांवर कारवाईचे आदेश दिले होते. अश्रफ पाकिस्तानचे ऊर्जामंत्री असतानाच्या कार्यकाळातील हा घोटाळा आहे. रेंटल पॉवर प्रकरणात त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने एएनबीला अश्रफ यांना अटक करण्याचा आदेश दिला होता. मात्र, एएनबीचे प्रमुख फजीह बोखारी यांनी पंतप्रधानांविरोधात ठोस पुरावे नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते.

Next Article

Recommended