आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nairobi Terrorist Attack: Rubbing Blood On Body From Defending Terrorist

नैरोबी दहशतवाद हल्ला: मृत वाटावे म्हणून स्वत:ला मृतदेहावरील रक्त फासले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैरोबी - 26 / 11 च्या धर्तीवर नैरोबीमधील शॉपिंग मॉलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथील साफसफाई पूर्ण झालेली नाही. मृतांचा आकडा वाढू शकतो, असे सांगण्यात आले. गुरुवारी भारतीय वंशाची ओलिस स्नेहा कोठारी हिची हकिगत समोर आली. त्यांनी दहशतवाद्यांना चकवा देऊन स्वत: चे प्राण वाचवले. त्यांची ही थरारक कहाणी..

नैरोबीच्या वेस्ट गेटवर हल्ला झाला तेव्हा स्नेहा मॉलमध्ये होत्या. रेडिओ वाहिनीवर प्रेझेंटर म्हणून काम करणार्‍या स्नेहा यांनी स्काय न्यूजसोबत घटना शेअर केली. मॉलमध्ये गोळीबार सुरू झाल्यानंतर त्या मॉलच्या पार्किंग भागात दडून राहिल्या. जेव्हा तेथे दहशतवादी आले. तेव्हा त्यांनी जोरदार गोळीबार करण्यास सुरुवात केली. सर्वत्र आक्रोश, धावाधाव सुरू झाली होती.

लोक कारच्या मागे लपून बसण्याचा प्रयत्न करू लागले. मीदेखील लपून बसले. माझ्या बाजूला असलेल्या एका मुलाला एक गोळी लागली. आम्ही कारच्या मागेच पडलो. दहशतवादी खाली पडलेल्या व्यक्तीवरही गोळीबार करत होते. मी मात्र नशीबवान राहिले. मला गोळी लागली नाही. एवढय़ात एखाद्याचा मोबाइल वाजला तर दहशतवादी त्या दिशेने जातील, अशी भीती मनात डोकावत होती. मी स्वत: चा मोबाइल बंद केला होता, परंतु तेवढय़ात गोळी लागून पडलेल्या बाजूच्या मुलाचा मोबाइल खणखणू लागला. मी तो फोन घेण्यासाठी त्याच्याकडे हात नेला. तोच त्याच्या खिशातून रक्ताचे लोट वाहू लागले. मी कसा तरी त्याचा फोन बंद केला आणि त्याचे रक्त आपल्या अंगाला फासून तशीच निपचित पडून राहिले. चेहर्‍यावर केस ओढून घेतले. जेणेकरून दहशतवाद्यांना मी मृत असल्याचे वाटेल.
इंटरपोलची नोटीस
लंडन । नैरोबीच्या मॉलवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इंटरपोलने संशयित ब्रिटिश महिला दहशतवादी सामंता ल्यूथवेटच्या विरुद्ध वॉरंट जारी केले आहे. ती व्हाइट विडो नावाने कुख्यात आहे. केनियाने यासाठी इंटरपोलकडे धाव घेतली होती.