आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायजेरियात माथेफिरूंच्या गोळीबारात 48 जण ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लागोस - नायजेरियात बंदूकधार्‍यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यात 48 जण ठार झाले. रक्तपाताची पहिली घटना देशाच्या बेन्यू प्रांतात झाली. त्यात 20 जण ठार झाले. माथेफिरूंनी या भागातील अनेक घरांना आगीही लावल्या. ईशान्येकडील अन्य एका घटनेत 28 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

बेन्यू प्रांतातील घटना शुक्रवारची असून यॉर्डी अकाहिना गावात हा हिंसाचार झाला. हा हल्ला ख्रिश्चन समुदायावर झाल्याचे दिसते. कारण या घटनेतील मृत ख्रिश्चन समुदायातील आहेत. हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अन्य घटनेत योबे प्रांतातील मामुडो शहरातील सरकारी माध्यमिक शाळेला लक्ष्य केले. हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करून इमारतीला पेटवून दिले. त्यात 28 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यामागे बोको हरम या दहशतवादी गटाचा हात असल्याचा अंदाज आहे.