आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्फातील नग्न फोटो फेसबुकवर झळकवण्यासाठी उडाली झुंबड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुक हे विचारांचे आदान-प्रदान करण्याचे माध्यम आहे. मात्र, या माध्यमाचा वापर करुन काय काय होऊ शकते याचा अंदाज बांधणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. असाच काही अनुभव इंग्लंडच्या विल्टशर काऊंटी येथील लिएन मायर्स यांना आला आहे. या महिलेने फेसबुकवर एक अपील केले आणि त्याच्या कितीतरी पटीने त्याला प्रतिसाद मिळाला.

मायर्सने फेसबुकवर एक पेज तयार केले, त्यावर तिने बर्फातील नग्न छायाचित्रे शेअर करण्याची मागणी केली होती. तिच्या मागणीला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्या पेजवर कडाक्याच्या थंडीत बर्फामध्ये अंगावर एकही वस्त्र नसलेल्यांची शेकडो छायाचित्रे येऊन धडकली.

मायर्सने हे पेज आणि त्यावर ही अनोखी मागणी केली होती ती, एका हॉस्पिटलकरीता मदतनिधी उभारण्यासाठी. त्याला जगभरातून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल तिने आभार व्यक्त केले आहेत. मायर्स म्हणते, जगाच्या प्रत्येक कोप-यातून छायाचित्रे आली आहेत. ब्राझील, इस्त्राईल, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इटली, जपान अशा कित्येक देशातून छायाचित्रे आली आहेत.

यातील प्रत्येकानेच नग्न छायाचित्रे पाठवले असे नाही तर, चहू बाजूला पसरलेल्या बर्फात ज्याला जेवढी थंडी सोसवेल त्याने तेवढे कपडे उतरवले आहेत. मायर्स आता या पेजवरील छायाचित्रातून काही निवडक छायाचित्रांचे कॅलेंडर तयार करणार आहे. त्यातून मिळणारे पैसे ती तिच्या मुलींच्या जन्म ज्या हॉस्पिटलमध्ये झाला त्याला देणार आहे.