आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Name Of White Widow Appearing In Kenya Terror Attack

\'व्‍हाईट विडो\'ने रचला केनियातील हल्‍ल्‍याचा कट, जाणून घ्‍या तिचा दहशतीशी संबंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- केनियाच्‍या नैरोबी येथील शॉपिंग मॉलमध्‍ये अल शबाब या दहशतवादी संघटनेने भीषण हल्‍ला केला. केनियातील ओलीसनाट्य संपले असले तरीही या क्रूर हल्‍ल्‍याने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या हल्‍ल्‍यामागे अल शबाबचा हात आहे. मात्र, हल्‍ल्‍याचा कट रचण्‍यापासून प्रत्‍यक्ष अंमलबजावणीचे काम एका आयरीश महिलेने केले आहे. प्रत्‍यक्षदर्शीनी सांगितले, की हल्‍ल्‍यादरम्‍यान दहशतवाद्यांचे नेतृत्त्व एक महिला करत होती. आयरीश महिला 'व्‍हाईट विडो' म्‍हणून ओळखली जाते. दक्षिण आफ्रिकेसह जगभरात दहशतवादाची नवी ओळख ही महिला बनू पाहत आहे. केनियाच्‍या अधिका-यांच्‍या माहितीनुसार, या महिलेचे नाव सॅमन्‍था लुथवेट असून मुस्लिम धर्म स्विकारल्‍यानंतर ती अल कायदाची सदस्‍य बनली. लुथवेटने ब्रिटन, अमेरिकेसह युरोपमध्‍ये मुस्लिम तरुणांना दहशतवादी बनविण्‍यसाचे काम करत आहे. धक्‍कादायक म्‍हणजे गैर मुस्लिमांनाही ती लक्ष्‍य करत आहे. पाकिस्‍तानातील दहशतवादी गटांसोबतही तिचे संबंध आहेत. लंडनला हादरावून टाकणा-या 2005 मधील बॉम्‍बस्‍फोटांमध्‍ये याच महिलेचा हात आहे.

ही 'व्‍हाईट विडो' दहशतवादी का बनली? काय आहेत तिचे इरादे? जाणून घ्‍या या खास रिपोर्टमध्‍ये...