फ्रेंच सम्राट नेपोलियन बोनापार्टला इटलीच्या एल्बा बेटावर विजनवासात पाठवण्यात आले होते. विजनवास संपवून नेपोलियन रविवारी पोटरेफेरारिओ बंदरावर परतला. त्या घटनेला 200 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोनशे वर्षांपूर्वी नेपोलियनचे जसे स्वागत करण्यात आले अगदी त्याच थाटात संपूर्ण युरोपातील हौशी लोकांनी नेपोलियनचे सैन्य आणि त्याच्या काळातील वेशभूषा करून त्या ऐतिहासिक दिनाचा स्मरणोत्सव साजरा केला.