आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Gave New Mantra To Youth, Divya Marathi

अमेरिका दौरा: नरेंद्र मोदींनी युवकांना दिला 'कॅन डू' चा मंत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - काहीतरी "हटके' पण ते भव्य-दिव्यच करायचे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वभावगुण. अमेरिका दौ-यातही रविवारी प्रत्येकाला तोच अनुभव आला. स्थळ होते प्रसिद्ध सेंट्रल पार्क आणि निमित्त होते रॉक कन्सर्टचे. नामांकित रॉकस्टार्सच्या उपस्थितीत झालेल्या ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलमध्ये मोदींनी हजारो युवकांसमोर बोलताना जागतिक शांतीचा संदेश आणि "कॅन डू' अर्थात "करू शकतो'चा मंत्रही दिला.

स्वच्छता, गरिबी निर्मूलनाच्या कार्यात झोकून दिलेल्या "ग्लोबल सिटीझन' या वेबसाइटने हा कार्यक्रम घेतला. त्यास वेबसाइटचे हजारो सदस्य उपस्थित होते.
पांढरा कुर्ता, निळे जॅकेट घातलेल्या मोदींनी भाषणाची सुरुवात इंग्रजीतून केली. "हाऊ आर यू डुईंग इन न्यूयॉर्क...' असे ते म्हणताच उपस्थित ६० हजारांच्या समुदायाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सात मिनिटे ते इंग्रजीतून बोलले. बंदिस्त सभागृहांतील समारंभांपेक्षा या मोकळ्या जागेत भारावून गेल्याचे मोदी म्हणाले.

उपस्थितांना वंदन : मी आपल्याला वंदन करतो. तुम्हा प्रत्येकाबद्दल मला गर्व आहे. तुमचे कुटुंबीय, मित्र, तुमच्या देशालाही गर्व वाटत असेल याची खात्री आहे, अशा शब्दांत ६४ वर्षीय मोदींनी अमेरिकेतील तरुणाईची मने जिंकली.

मोदी म्हणाले
* काही लोकांची धारणा आहे की जग ज्येष्ठांच्या बुद्धिमत्तेच्या आधारे बदलते. मात्र, मला युवकांचा आदर्शवाद, त्यांची ऊर्जा आणि काहीतरी करण्याची जिद्द अधिक शक्तिवान वाटते.
* भारतातही हाच आशावाद आहे. आमच्या देशात ८० कोटी युवकांनी देशात परिवर्तन घडवण्याचा ध्यास घेतला आहे. प्रत्येकाला विश्वास वाटतो आहे.
*गरिबी दूर झाली पाहिजे. पिण्याचे पाणी आणि स्वच्छता प्रत्येकाच्या घरात पोहोचली पाहिजे. प्रत्येकाला सुदृढ आरोग्य मिळाले पाहिजे. प्रत्येकाचे स्वत:चे एक घरही असावे...
गरब्याचा उत्साह...
* रविवारी मॅडिसन स्क्वेअरवर मोदींच्या भाषणाचे तिकीट ज्यांना मिळाले नाही त्यांनी बाहेर चक्क गरबा सुरू केला.
* या कार्यक्रमाची तिकिटे आयोजकांनी ऑनलाइन विकली होती.
* रविवारी मोदींनी अमेरिका, कॅनडाहून आलेल्या काही शीख नेत्यांची भेट घेतली. तसेच श्रीलंका, बांगलादेश व नेपाळच्या प्रमुखांशीही चर्चा केली.

पुढे वाचा मोदींच्या शानदार प्रवेशाविषयी...