आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Is Sign Of Failure, American Congress Committee Remark

नरेंद्र मोदी हे ‘अपयशाचे प्रतीक’,अमेरिकी काँग्रेसच्या समितीचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे जातीय दंगलीसाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा देण्यात आलेल्या अपयशाचे प्रतीक आहेत, असे रोखठोक मत अमेरिकी काँग्रेसने धार्मिक स्वातंत्र्यासंदर्भात नियुक्त केलेल्या समितीतील दोन प्रमुख सदस्यांनी मांडले आहे.
अमेरिकी काँग्रेसच्या या समितीतील सदस्यांनी मोदींचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे. गुजरातचेच पुत्र असलेले महात्मा गांधी यांनी एक व्यापक, सहिष्णू आणि सर्वधर्म समभावसंपन्न देशाचे स्वप्न पाहिले होते. जसेजसे 2014 जवळ येत आहे, तशी उत्सुकता वाढत आहे. भारतात धर्मांध शक्तीची सत्ता येईल की धार्मिक स्वातंत्र्यांची, हे सर्व वेळच सांगेल, असे सीएनएनसाठी लिहिलेल्या एका लेखामध्ये कॅटरिना स्वेट आणि मॅरी एन ग्लेंडन यांनी म्हटले आहे. ‘द टू फेसेस ऑफ इंडिया’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखात म्हटले आहे की, गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या जातीय दंगलीवेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते. ही दंगल रोखण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले होते. त्यामुळे तेच दंगलखोरांना शिक्षा देण्यात अपयशी ठरल्याचे भारताचे प्रतीक आहेत.
2005 मध्ये गुजरात उच्च न्यायालयानेही मोदींच्या प्रशासनावर परखड टीका केली होती. गुजरातमधील दंगलींसंदर्भातील आणि इतरही काही प्रकरणांची अद्याप चौकशी झालेली नाही. गुजरातमधील या सर्वात वादग्रस्त नागरिकाला भाजपने पंतप्रधानपदासाठी पुढे केले आहे, याचे दु:ख होते, असे या समितीने म्हटले आहे.
आणखी एक तक्रार
उत्तर प्रदेशातील सभेत सीबीआय आणि इंडियन मुजाहिदीनबाबत मोदी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आणखी एक तक्रार दाखल केली आहे. मोदी यांचे वक्तव्य पूर्वग्रहदूषित आणि खोडकर असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.‘यह सपा, यह बसपा, यह काँग्रेस इनकी तिकडी चुनाव के मैदानमें नही आएगी अगली चुनाव में मुझे लगता है सीबीआय, इंडियन मुजाहिदीन चुनाव का मोर्चा संभालेंगे ताकि काँग्रेस को बचाएं सकें’, असे मोदी यांनी म्हटले होते.
चहावाला पंतप्रधान कसा?
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर सप नेते नरेश अग्रवाल यांनी जोरदार टीका केली. एका चहा विक्रेत्याकडे देशाच्या पंतप्रधानांचा राष्ट्रीय दृष्टिकोन असूच शकत नाही, असे अग्रवाल म्हणाले. मोदी या देशाचे पंतप्रधान बनू इच्छितात. एखाद्या ‘सिपाया’ला (कॉन्स्टेबलला) ‘कप्तान’ (पोलिस अधीक्षक) बनवले तरी त्याचा पोलिस अधीक्षकाचा दृष्टिकोन असूच शकत नाही, तो सिपायाच्याच दृष्टिकोनातून वागेल, असे अग्रवाल म्हणाले.