आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Latest News About Time Magazine Poll

एक्झिट पोलमध्‍ये मोदींचीच चर्चा, 'टाईम'च्‍या शर्यतीत मात्र घसरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच राज्‍यातील विधानसभा निवडणुकीनंतर मतदानेतर चाचण्‍यांनी भारतीय जनता पक्षाच्‍या बाजुने कौल दिला आहे. अर्थात याचा खरा निकाल रविवारी 8 डिसेंबरलाच लागणार आहे. परंतु, भाजपने नरेंद्र मोदींच्‍या प्रभावावरुन गुणगान गायला सुरुवात केली आहे. मोदीच देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्‍याचे भाजप म्‍हणत आहे. निश्चितच मोदी देशातील अतिशय लोकप्रिय नेते आहेत. परंतु, जागतिक स्‍तरावर त्‍यांना कडवी स्‍पर्धा मिळत आहे. टाईम मॅगझिनच्‍या 'पर्सन ऑफ द ईयर' पुरस्‍कारासाठी सुरु असलेल्‍या ऑनलाईन मतदानात मोदींचे स्‍थान घसरले आहे. ते सध्‍या चौथ्‍या स्‍थानावर आहे. मात्र, जगातील अनेक दिग्‍गज या चाचणीत त्‍यांच्‍या मागे आहेत.

या पुरस्‍काराची घोषणा 11 डिसेंबरला होणार आहे. आतापर्यंत सर्वाधित मते इजिप्‍तचे लष्‍करप्रमुख अब्‍देल फतेह अल सीसी यांना मिळाली आहेत. या पुरस्‍काराची निवड टाईमचे संपादक करतात. वाचकांच्‍या मतांचाही त्‍यात विचार करण्‍यात येतो. त्‍यामुळे मोदी चौथ्‍या स्‍थानावर असले तरीही त्‍यांची निवड होऊ शकते.

मोदींना सध्‍या 14 टक्‍के मते मिळाली आहेत. त्‍यांनी अमेरिकेचे अध्‍यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे राष्‍ट्रपती व्‍लादीमिर पुतीन यांना मागे टाकले आहे. ओबामा यांना दोन वेळा हा पुरस्‍कार मिळाला आहे. परंतु, यावेळी त्‍यांना फक्त 0.4 टक्‍के मते मिळाली आहेत. तर पुतीन यांना 1 टक्‍का मते मिळाली आहेत.

टाईम मॅगझिनने मोदींना 'वादग्रस्‍त हिंदू राष्‍ट्रवादी' म्‍हटले आहे. तसेच जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्‍या देशात गुजरातचे मुख्‍यमंत्री असलेले नरेंद्र मोदी हेच कॉंग्रेसला सत्तेवरुन खाली खेचू शकतात, असेही टाईमने म्‍हटले आहे.

मोदींपेक्षा जास्‍त पसंती मिळालेल्‍या व्‍यक्तींबाबत जाणून घ्‍या पुढील स्‍लाईड्समध्‍ये...