आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, America Tour, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधान मोदींचा आजपासून अमेरिका दौरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी पाच दिवसांच्या अमेरिका दौ-यावर रवाना होणार आहेत. त्यांच्या व्यग्र कार्यक्रमातून ते वेळ काढून संयुक्त राष्ट्राची आमसभा तसेच भारतीय अमेरिकी समुदायाला मार्गदर्शन करतील. त्याच बरोबर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांसह अमेरिकेतील उद्योगपतींशीही ते चर्चा करतील. भारत आणि अमेरिके दरम्यान सहा करार होतील. मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने बुधवारी त्यास मंजुरी दिली.

नवरात्रोत्सव काळात मोदी दौ-यावर आल्यामुळे त्यांच्या भोजनाची विशेष बडदास्त ठेवली जाणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. प्रथम महिला मिशेल ओबामा यांनी मधुमक्षिका पालन केले आहे. तेथून येणा-या मधाचा वापर मोदी यांच्या मिष्टान्नासाठी केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, इस्लामिक स्टेट अतिरेक्यांविरोधात जागतिक आघाडी उघडण्याचा भाग म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाठिंबा मागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयएसने इराक आणि सिरियात कब्जा केलेला भाग ब्रिटनच्या भौगोलिक क्षेत्राएवढा आहे.