आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Divya Marathi, America Tour

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका दौ-यात नरेंद्र मोदींची राष्ट्रीय स्मारकांना भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अमेरिका भेटीदरम्यान वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावास परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहणार असून ऐतिहासिक लिंकन मेमोरियल, मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर मेमोरियल या महत्त्वाच्या स्थळांना भेट देणार आहेत.

पंतप्रधान ९-११ च्या स्मृतिस्थळालाही ते भेट देणार आहेत. भारतीय दूतावासाच्या इमारतीसमोरील महात्मा गांधींचा पुतळा अटलबिहारी वाजपेयी यांनी भेट दिला होता. १६ सप्टेंबर २००० रोजी याचे अनावरण वाजपेयी व तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या उपस्थितीत झाले होते. अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे स्मारक १९२२ मध्ये उभारण्यात आलेले ऐतिहासिक स्थळ आहे. तसेच २२ ऑगस्ट २०११ रोजी राष्ट्राला अर्पण करण्यात आलेले मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.)स्मारक या महत्त्वाच्या राष्ट्रीय स्थळांना मोदी भेट देतील. विशेष म्हणजे मार्टिन ल्यूथर किंग हे म. गांधींचे अनुयायी होते.

नियोजित कार्यक्रम
२९ सप्टेंबर रोजी मोदी वॉशिंग्टनला पोहोचणार असून ३० सप्टेंबरला मायदेशी प्रयाण करतील. ३० सप्टेंबर रोजीच व्हाइट हाऊसमध्ये नरेंद्र मोदी व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची बैठक होणार आहे. पंतप्रधानांच्या या नियोजित कार्यक्रमात कोणत्याही क्षणी बदल केला जाण्याची शक्यता पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी वर्तवली आहे.