आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Prime Minister, United Nations, Divya Marathi

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात पंतप्रधान मोदी हिंदीतच बोलणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदीतूनच भाषण करतील. रविवारी हिंदी दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ही माहिती दिली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीतून बोलणारे मोदी दुसरे पंतप्रधान असतील. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राजनाथ म्हणाले, एक मंत्री या नात्याने मी एकदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या अिधवेशनात हिंदीतून भाषण केले होते.

बाहेर देशांत मोदी जेव्हा एखाद्या शिष्टमंडळाची किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेतात तेव्हाही ते हिंदीतून बोलतात. येत्या २७ सप्टेंबरला मोदींचे संयुक्त राष्ट्रसंघात भाषण होऊ शकते. राजनाथ म्हणाले, देशातील ५५ टक्के लोक हिंदी बोलतात आणि ८५ टक्के लोकांना मातृभाषा वेगळी असूनही िहंदी समजते. बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, श्यामाप्रसाद मुखर्जी, एन. गोपालस्वामी अय्यंगार यांनीही हिंदीचा प्रसार व प्रचार करण्यावर भर दिला होता.