आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi No Address To Joint Session, But PM To Meet 50 US Senators

अमेरिकी संसदेत मोदींच्या भाषणाची शक्यता धूसर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - येत्या सप्टेंबरच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिका भेटीवर जातील तेव्हा अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात त्यांचे भाषण होण्याची शक्यता फारच कमी आहे. नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रतिनिधींना प्रचारार्थ मतदारसंघांत जाणे गरजेचे असल्याने काँग्रेसचे संयुक्त अधिवेशन बोलावणे शक्य होणार नाही.

अमेरिकी प्रतिनिधी सभेतील 80 हून अधिक सदस्य आणि अनेक ज्येष्ठ सिनेटर्सनी याबाबत सभापती जॉन बोनर आणि सिनेट नेते हॅरी रीड यांना पत्र लिहून नरेंद्र मोदींचे काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात भाषण ठेवावे, अशी विनंती केली होती. मात्र, प्रत्यक्षात हे शक्य होणार नाही, अशीच शक्यता आहे. कारण, या परिस्थितीत हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज किंवा सिनेट या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन आयोजित करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होणार नाही, अशी स्थिती आहे.

मोदींच्या अमेरिका दौर्‍याबाबत अद्याप दोन्ही देशांच्या सरकारांनी अधिकृत घोषणा केली नसली तरी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच हा दौरा अपेक्षित आहे. या दौर्‍यात मोदीही अमेरिकी संसदेतील 50 लोकप्रतिनिधींना वेगवेगळे अथवा एकत्रपणे भेट घेण्याची शक्यता आहे. नुकतेच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी भारत दौर्‍यावर आले होते. त्या वेळी त्यांनी मोदींना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले आहे.