आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Pakistan Nawaz Sharif Oath Ceremony

मोदींचा शपथविधी सोहळा असा झळकला पाकिस्तानी, विदेशी मीडियात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (सोमवार) पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासह सार्क देशांचे प्रमुख नेतेमंडळी आणि वेगवेगळ्या देशांचे राजदूत प्रामुख्याने उपस्थित होते. भारतात पहिल्यांदाच असा भव्य शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. याची पाकिस्तानसह विदेशी मीडियाने प्रामुख्याने नोंद घेतली आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी पाकिस्तानी मीडियाने त्यांच्यावर टोकदार टीका केली होती. परंतु, त्यांच्या शपथविधीला नवाझ शरीफ आले असल्याने पाकिस्तानी मीडियाचा सूर जरा मवाळ झाला आहे. नरेंद्र मोदी काश्मिरसह इतरही वादग्रस्त विषयांवर तोडगा काढतील, असा आशावाद डॉन या वृत्तपत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, इतरही वृत्तपत्रांनी शपथविधीच्या कशा स्वरूपाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत....