आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narendra Modi Speaks In Hindi At UN Assembly, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींचे आज संयुक्त राष्ट्र संघात भाषण, जागतिक व्यासपीठावर ह‍िंदीतून बोलणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक अमेरिका दौ-याला शुक्रवारी सुरुवात झाली. फ्रँकफर्टमध्ये विश्रांती घेतल्यानंतर ते शुक्रवारी येथे दाखल झाले. त्यांचा हा पाच दिवसांचा दौरा आहे. शनिवारी ते संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत ह‍िंदीतून भाषण करतील.

भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार, गुंतवणूक या दृष्टीने हा महत्त्वाचा दौरा मानला जातो. अमेरिकेत दाखल झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रात त्यांचे भाषण होणार आहे. मोदी जागतिक व्यासपीठावरून भारताची भूमिका कशी मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्यासोबत त्यांची पहिलीच बैठक होणार आहे. ही बैठकही अत्यंत महत्त्वाची आहे. या दौ-यात मोदी विविध क्षेत्रांतील उद्योजकांना भेटून चर्चा करतील. भारतात गुंतवणुकीसाठी देशाची दारे खुली असल्याचे त्यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे.

त्यामुळे अमेरिका दौ-यातून ते मोठी गुंतवणूक भारतात आणतील, असा होरा आहे. व्यापाराशिवाय सुरक्षेच्या क्षेत्रातही दोन्ही देश परस्परांसोबत काही करार करण्याची शक्यता आहे. मोदींच्या दौ-यातून भारत-अमेरिका संबंध आणखी मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जाते. अमेरिका हा भारताचा ग्लोबल नॅचरल भागीदार असल्याचे त्यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. दरम्यान, रविवारी मेडिसन गार्डनमध्ये १८ हजार एनआरआयसमोर त्यांचे भाषण हादेखील औत्सुक्याचा विषय ठरला आहे.

भारताच्या अमेरिकेकडून अपेक्षा
संरक्षण : जगात सर्वाधिक शस्त्रे भारत आयात करतो. २०११ मध्ये भारताने ३६,८०० कोटींचे शस्त्र खरेदी केले. आत्मनिर्भरतेसाठी संरक्षण क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली. भारताला अमेरिकेकडून संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक आणि तंत्रज्ञान मदतीची अपेक्षा आहे.

गुंतवणूक: ५०० अब्ज डॉलरच्या व्यवसायाची मोदींना अपेक्षा
भारतात अमेरिकेची १२ अब्ज डॉलरची गुंतवणूक आहे. याला ३० ते ५० अब्ज डॉलरवर पोहोचवणे हे मोदींचे लक्ष्य आहे. दोन्ही देशांत ९३ अब्ज डॉलरचा व्यवसाय आहे. पुढील पाच वर्षांत दोन्ही देशांत ५०० अब्ज डॉलरचा व्यवसाय व्हावा, अशी मोदींची अपेक्षा आहे.

दहशतवाद : अतिरेकी संघटनांविरुद्ध कठोर कारवाईचा विश्वास
अल जवाहिरीकडून भारताला देण्यात आलेल्या धमक्या, अल कायदा, तालिबान व पाकिस्तानी अतिरेकी संघटनांची भारताला चिंता आहे. त्यांना लढा देण्यासाठी भारत अमेरिकेकडून मदत मागू शकतो.

व्हिसा नियमांत सवलत
आयटी नोकरदारांसाठी व्हिसा नियमांत सवलत, इमिग्रेशन विधेयकातून भारतविरोधी तरतुदी हटवणे, आऊटसोर्सिंग, व्यावसायिक संबंधांतील असमतोल दूर करण्याची मागणी.

गुंतवणुकीसाठी भारत जगात सर्वोत्तम
७० देशांतील १६०० ज्येष्ठ एक्झिक्युटिव्हच्या मते भारत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम देश आहे.
1 भारत 2 ब्राझील 3 चीन 4 कॅनडा 5 अमेरिका
स्रोत : अर्न्स्ट अँड यंग

अमेरिकेची इच्छा
संरक्षण : भारत-अमेरिकेदरम्यान सुमारे ७ अब्ज डॉलरचा संरक्षण सौदा थंड बस्त्यात आहे. अमेरिकेला हे लवकर पूर्ण करायचे आहेत.

दहशतवाद: आयएसआयएस मुद्यावर साथ व पाठिंबा
अमेरिकेला अफगाणिस्तान, इराक, सिरियामधील दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारतासारख्या मोठ्या राष्ट्रांच्या मदतीची गरज आहे. अल कायदा, आयएसआयएस, तालिबानविरोधात लढण्यासाठी ओबामा मोदींकडून मदत मागू शकतात.

सर्वाधिक खर्च
७५ लाख डॉलर दररोज खर्च करत आहे अमेरिका आयएसआयएसविरुद्ध लढण्यासाठी.
50 कोटी डॉलर खर्च.जूनपासून आतापर्यंत या मोहिमेसाठी अमेरिकेने केला आहे.

डब्ल्यूटीओला पाठिंब्याची मागणी
डब्ल्यूटीओसाठी अमेरिका भारताकडून पाठिंबा मागू शकतो. मात्र, बियाणे, अन्न आणि शेतक-यांचे अनुदान इ.काही मुद्यांवर भारताला आक्षेप आहे. यात भारताला सूट मिळू शकते.