आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Speech At Allphones Arena In Sydney

ऑस्ट्रेलियात मोदी म्हणाले, 2019 पर्यंत भारताला स्वच्छ करणार, बघा दौऱ्याचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिडनीतील ऑलफोन्स एरिना येथे संबोधित केले.)
सिडनी - महात्मा गांधी यांनी भारतीयांना स्वातंत्र्य दिले. आपण त्यांना स्वच्छ भारत द्यायला हवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) सांगितले.
नरेंद्र मोदींना ऐकण्यासाठी, बघण्यासाठी सिडनीतील ऑलफोन्स एरिना येथे जमलेल्या लाखो लोकांना संबोधित करताना ते म्हणाले, की ऑस्ट्रेलियात येण्यासाठी एक रात्रीचा प्रवास आहे. पण भारताच्या पंतप्रधानांना येथे येण्यासाठी 28 वर्षे लागली. आता ऐवढी वर्षे लागणार नाहीत. लोकशाही दोन्ही देशांचा पाया आहे. देशाच्या कल्याणासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा. देशातील सर्वसामान्यांच्या विकासासाठी आम्ही जन-धन योजना सुरू केली. आजही भारतात तेच कार्यलये, तेच अधिकारी आहेत. केवळ काम करण्याची पद्धत बदललेली आहे.
मोदी म्हणाले, की युवाशक्ती भारताची ड्रायव्हिंग फोर्स आहे. याच्या बळावर आपण जगाला भारताची क्षमता दाखवू शकतो. जग आता बाहुबल किंवा धनबलाने नव्हे तर बुद्धिबलाने चालणार आहे. कॉंग्रेसला केवळ कायदा करायला आवडते. त्याची अंमलबजावणी झाली नाही तरी चालेल. पण मला कायदे रद्द करायला आवडतात. आमचा भर अंमलबजावणीवर आहे. आमचे रिझल्ट ओरिएटेंड काम आहे. ज्यांच्याजवळ PIO कार्ड असेल त्यांना आजन्म व्हीसा मिळेल. पुढल्या वर्षी जानेवारी महिन्यात PIO आणि CIO ला एकत्र केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सिडनीतील ऑलफोन्स एरिना येथे आले आहेत. मोदींचा ऑस्ट्रेलिया दौर्‍याचा आज चौथा दिवस आहे. या मेगा इव्हेंटबद्दल भारतीय वंशाच्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आज सकाळी मोदी ब्रिस्बेनमधील क्विन्सलँड प्रांतातून सिडनीमध्ये दाखल झाले.
मेलबर्न ते सिडनी मोदी एक्स्प्रेस
अमेरिकेप्रमाणेच येथेही त्यांच्या भाषणाचे चांगलेच आकर्षण पाहायला मिळाले असून त्यासाठी मेलबर्न ते सिडनी अशी विशेष रेल्वे रविवारी धावली. सोमवारी ती सिडनीला पोहोचेली. प्रवासात भारतीय वंशाचे अनेक उत्साही नागरिक सहभागी झाले होते. त्यात महिला, लहान मुलांचाही समावेश होता. मोदी यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट परिधान केलेले प्रवासी सिडनीच्या रेल्वेस्थानकावर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सिडनीत कसे झाले मोदींचे स्वागत आणि ऑलफोन्स एरिना येथील नागरिकांचा उत्साह...