(फोटो: ‘न्यूयॉर्क पॅलेस’ हॉटेल )
न्यूयॉर्क - पंतप्रधान म्हणून अमेरिकेच्या
आपल्या दौर्यावर
नरेंद्र मोदी एअर इंडियाच्या विशेष बोईंग विमानाने न्यूयॉर्कच्या जे.के.एफ विमानतळावर उतरले. येथून ते ‘न्यूयॉर्क पॅलेस’ या हॉटेलमध्ये गेले. विमानतळावरून हॉटेलपर्यंतच्या मार्गात भारतीयांनी मोदींचे ठिकठिकाणी स्वागत केले.
न्यूयॉर्कमध्ये मोदींना राहण्यासाठी न्यूयॉर्कमधील 'न्यूयॉर्क पॅलेस' या हॉटेलची निवड करण्यात आली. हे न्यूयॉर्कमधील सर्वात हायप्रोफाईल हॉटेल्सपैकी एक आहे. अमेरिकेच्या एलिट क्लासपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनाच या हॉटेलमध्ये थांबायला आवडते. मोदींच्या एका रात्रीच्या विश्रामासाठी हॉटेलने 15 लाख रुपये भाडे आकारले आहे.
गेस्ट रुम्स
या हॉटेलमध्ये एकूण 822 गेस्ट रूम्स असून यांचे भाडे 32 हजार रुपयांपासून सुरू होते. तसेच ज्वेल सुटचे एका दिवसाचे भाडे 15 लाख रुपये आहे. या हॉटेलमध्ये स्पा अँड फिटनेस सेंटर, बकेट आणि मिटींग स्पेस आणि एक बिझनेस सेंटरसुध्दा आहे.
निर्माण कार्यासाठी लागले 7 वर्षे
55 मजल्याच्या या हॉटेलच्या निर्मितीचे काम 1974 मध्ये सुरू झाले तर 1981 मध्ये हे हॉटेल पुर्णपणे तयार झाले. या हॉटेलच्या इमारतीमध्ये डार्क ब्राँझ रिफ्लेक्टीव्ह आणि एंडोलाईज्ड अल्यूमिनिअम ग्लासचा वापर करण्यात आला आहे.
हॉटेल इन हायप्रोफाइल कल्चर:
- अमेरिकेची वृत्तवाहिनीवरील सीडब्ल्यू सीरीज ‘गॉसिप गर्ल’ या मालिकेचा बहूतांश भाग या हॉटेलमध्ये शुट करण्यात आला आहे.
- 1994 मध्ये प्रख्यात डच चिल्ड्रन शो ‘बेसी अँड एड्रियान’ चे आयोजनही याच हॉटेलमध्ये करण्यात आले होते.
- येथे अमेरिकेतील अनेक राष्ट्रीय पुरस्कार सोहळयांचे आयोजन करण्यात आले आहे. उदा. न्यूयॉर्क सिटी फॅशन वीक, हॉलिडे ट्री लायटिंग विद मिस अमेरिका, सिंड्रेला ऑन ब्रॉडवेन अवार्ड पार्टी इत्यादी.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, न्यूयॉर्कच्या पॅलेस हॉटेलचे फोटो
सौजन्य -www.newyorkpalace.com