आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा अमेरिका दौरा : 5 महत्त्वाचे पैलू जे प्रथमच आले समोर, जाणून घ्या छायाचित्रातून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच दिवसीय अमेरिका दौरा अतिशय महत्त्वाचा होता. मोदी पंतप्रधान म्हणून प्रथमच अमेरिकेला गेले होते. संयुक्त राष्ट्र महासभेत त्यांनी प्रथमच भाषण केले, त्याशिवाय गुंतवणूक, उद्योग, संरक्षण करार, दहशतवाद आणि इतर अनेक मुद्यांवर त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जगातील अनेक देशांच्या बड्या कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली. अमेरिकेत ज्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले, त्यावरुन ते एखाद्या देशाचे पंतप्रधान कमी सेलिब्रिटी जास्त वाटत होते. जाणून घेऊया त्यांच्या दौर्‍याशी संबंधीत पाच महत्त्वाचे पैलू जे प्रथमच समोर आले आहेत.
1 - अमेरिकेत प्रथमच दुसर्‍या एखाद्या देशाच्या नेत्याचे एवढ्या मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. ते ही अशा व्यक्तीचे ज्यांना नऊ वर्षांपूर्वी व्हिजा देण्यास अमेरिकेने नकार दिला होता. त्याशिवाय मोदी आणि अमेरिकेतील भारतीय वंशाच्या समुदायामध्ये जो ताळमेळ आणि कनेक्शन दिसले तो याआधी क्वचितच पाहायला मिळाले.
2 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सलग दोन दिवस मोदींची भेट घेतली. पहिल्या दिवशी त्यांनी डिनर दिले आणि नंतर शिखर चर्चा केली. आबामांनी एखाद्या नेत्याला एवढा वेळ देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ होती.
3 - मोदी आणि ओबामा यांनी अमेरिकेचे महत्त्वाचे वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टमध्ये संयुक्त संपादकीय लिहिले.
4 - न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये मोदी एका रॉक शोमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी तिथे हॉलिवूडचा अभिनेता ह्यूग जॅकमॅन देखील उपस्थित होता. दोघांनी एकमेकांना मिठी मारत थट्टा-मस्करी देखील केली.
5 - सर्वसाधारणपणे दोन देशांचे प्रमुख जेव्हा भेटतात तेव्हा ते भेटवस्तू घेऊन जातात. मोदी आणि ओबामा यांच्या भेटीवेळी भारताच्या पंतप्रधानांनी त्यांना स्पेशल गिफ्ट दिल्याचे बोलले जात आहे. मार्टिन ल्यूथर किंग हे ओबामांचे प्रेरणास्थान आहेत, हेच लक्षात ठेवून मोदींनी मार्टिन ल्यूथर किंग यांचे 1959 मध्ये भारत दौर्‍याशी संबंधीत भाषणाची प्रत भेट दिली. त्यासोबतच गांधीजींनी लिहिलेल्या 'गीते'ची विशेष आवृत्ती ओबामांना भेट दिली.

असा होता मोदींचा अमेरिका दौरा
- 25 सप्टेंबरला मोदी अमेरिकेला रवाना झाले.
- 26 ला ते न्यूयॉर्कच्या जॉन एफ. केनडी विमानतळावर उतरले तेव्हा तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते.
- 27 ला त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण केले. यात त्यांनी पाकिस्तानवर शरसंधान केले.
- 28 ला मोदींचे मेडिसन स्क्वेअर गार्डन येथे भारतीय वंशांच्या अमेरिकन नागरिकांसमोर भाषण झाले. यावेळी स्टेडियममध्ये 20 हजार लोक उपस्थित होते.
- 29 सप्टेंबरला मोदींनी भारतात अमेरिकेची गुंतवणूक वाढावी यासाठी टॉप 11 कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठक केली. त्यात पेप्सिको, गुगल, आयबीएम आणि मास्टर कार्ड यासारख्या कंपन्यांचा समावेश होता.
- 29 ला रात्री ओबामांनी मोदींच्या सन्मानात व्हाइट हाऊसमध्ये डिनर दिले. नवरात्रींचे उपवास सुरु असल्याने मोदी येथे फक्त गरम पाणी प्याले.
- 30 सप्टेंबरला मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची व्हाइट हाऊसमध्ये अधिकृत भेट झाली. दोघांनी दहशतवादाविरुद्ध एकजूट होऊन लढा देण्याचा निश्चय व्यक्त केला. दोन्ही नेत्यांनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये संयुक्त संपादकीय लिहिले.

(छायाचित्र - बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी मार्टिन ल्यूथर किंग मेमोरियलला भेट देण्यासाठी जात असताना.)

पुढील स्लाइडमध्ये, जाणून घ्या मोदींचा अमेरिका दौरा