आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Modi Visit In US:Modi Arrived On Stage,Indian National Anthem Echoes At Madison Square Garden

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चला आपल्या मातृभूमीकडे, तिच्या कल्याणासाठी आपण काही तर करु - मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - चला आपल्या मातृभूमीकडे, तिच्या कल्याणासाठी आपण काही तर करु, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेतील भारतीयांना भा‍वनिक साद घातले. मोदी रविवारी ( ता. 28) न्यूयॉर्क येथील मेडिसन स्क्वेअर येथे भारतीयांना संबोधित केले. मेक इन इंडियाच्या माध्‍यमातून तुम्ही भारताशी जोडू शकता. देशासाठी काहीतरी करायचे असेल, त्यांनी गोमाय डॉट कॉम या संकेतस्थळावर जावे, असे आवाहन त्यांनी उपस्थिती भारतीयांना केले.
तत्पूर्वी ते म्हणाले, विकासाची गंगा सव्वाशे कोटी लोक आणि सरकार एकत्र येऊन काम करणार आहे. भले मी तुमच्यापासून दूर राहत असेल, पण आपल्या अडीअडचणी मला माहीत आहे, असे अमेरिकेतील भारतीयांना नरेंद्र मोदींनी भ‍ावनिक साद दिली. जगाची नजर ही भारताकडे आहे. कारण आपल्याकडे मोठी बाजारपेठ आहे.
लोकशाहीबाबत मोदींनी सांगितले की, अमेरिका जगातील सर्वात जुनी लोकशाही राष्‍ट्र आहे, तर भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही राष्‍ट्र आहे.जगभर भारतीय पसरलेले आहे. यामुळे बंधू आणि भग‍िनींनो सरकारे विकास करु शकत नाही. ती फक्त आपले योजना लागू करु शकते. विकास जन सहभागातूनच होत असते.
21 वे शतक हे आशियाई शतक आहे. त्यास अमेरिकेच्या प्रसिध्‍द व्यक्तींनीही हे मान्य केले आहे . तसेच 21 शतक हे भारताचे शतक असणार आहे. जगातील सर्वात तरुण देश भारत आहे.
भारतात नुकतेच निवडणूका झाल्या आहेत. दरम्यान अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्ध मेडिसन स्क्वेअर गार्डन स्टेडियमवर पोहोचले. यावेळी अमेरिकन आणि भारतीय राष्‍ट्रगीताचे गायन करण्‍यात आले.
भाषणातील काही ठळक मुद्दे
* गरीबातील गरीबाचे लोकशाहीविषयी किती दृढनिष्‍ठ आहे हे सिध्‍द झाले आहे.
* निवडणूक जिंकणे ही एक जबाबदारी असते.
* मी आजपर्यंत 15 मिनिटसुध्‍दा आराम केलेला नाही.
* कौशल्यविकासासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्‍यात आले आहे. कौशल्यविकासामधून नोक-या निर्माण करणारे तयार होवो.
* मेक इन इंडियाच्या माध्‍यमातून भारताशी जोडू शकता. देशासाठी काहीतरी करायचे असेल, त्यांनी गोमाय डॉट कॉम या संकेतस्थळावर जावे.मागील सरकारे फक्त कायद्यांचेच गौरवगान करताना दिसले.
रंगारंग कार्यक्रमांची मेजवाणी
मोदींना एकण्यासाठी भारतीय वंशांचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. स्टेडियमच्या बाहेरही मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत. त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 'मोदी-मोदी' च्या घोषणा आणि मोदींचे चित्र असलेल्या टी-शर्टसमध्ये तरुण-तरुणी आहेत.
मोदींच्या कार्यकर्मानिमीत्त मेडिसन स्क्वेअरवर भारतीय चित्रपट गितांची मेजवाणी अमेरिकेतील भारतीय अनुभवत आहेत. प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमुर्ती हिने एक गाणे गायले.

स्टेडियमची 20 हजार आसनक्षमता
परदेशातील एखाद्या देशाच्या प्रमुखाने मेडिसन स्क्वेअर येथे भाषण करण्याची ही पहिली वेळ राहाणार आहे. 20 हजार आसन क्षमता असणार्‍या असणारे सभेचे हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथे मोदी फिरत्या रंगमंचावर उभे राहून भारतीय वंशांच्या लोकांना संबोधीत करणार आहेत. मोदी भाषण करतील तेव्हा तेव्हा हा रंगमंच दर 15 मिनीटांनी 360 डिग्री फिरणार आहे. त्यामुळे स्टेडियममधील प्रत्येक व्यक्तीला त्यांना पाहाता येणार आहे.
या कार्यक्रमात अमेरिकेचे प्रभावशाली नेते, भारतीय सेलिब्रिटीज, व्यापारी सहभागी होणार आहेत. टाइम्स स्क्वेअर येथील उंच इमारतींवर लावण्यात आलेल्या स्क्रिनवर मोदींचे भाषण लाइव्ह दाखवले जाणार आहे. आयोजकांनी येथील जवळपास सर्व स्क्रिन बुक केल्या आहेत. भाषणाच्या लाइव्ह थ्री-डी प्रसारणाचे हक्क सॅटेलाइट चॅनलला देण्यात आले आहेत. मोदी हिंदीमध्ये भाषण करणार असल्यामुळे, त्याचा दुसर्‍या भाषांमध्ये अनुवाद करण्याची व्यवस्था केली गेली आहे.

(पुढील स्लाइडमध्ये पाहा, व्हिडिओ आणि मेडिसन स्क्वेअरवरची ताजी छायाचित्र )