आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळावर ‘मंगल’: नासाने जारी केली आतापर्यंतची सवरेत्कृष्ट छायाचित्रे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने पहिल्यांदाच मंगळग्रहाचे दृश्य स्वरूपातील छायाचित्र टिपले आहे. या छायाचित्रात कोट्यवधी वर्षांपूर्वी तयार झालेल्या सरोवरापासून मंगळावर झालेल्या नजीकच्या काळातील परिवर्तन टिपण्यात आले आहे. नासाने राबवलेल्या ‘मार्स एक्सप्लोरेशन रोव्हर अपॉच्र्युनिटी’ मोहिमेअंतर्गत हे शक्य झाले आहे.
रोव्हर यानाने 21 डिसेंबर 2011 ते 8 मे 2012 या काळात मंगळाची विविधांगी छायाचित्रे टिपली आहेत. हे दृश्य 817 छोटी छोटी छायाचित्रे एकत्रित करून तयार करण्यात आले आहे. हिरवाईचा स्वर्ग (ग्रीनली हेवन)संबोधल्या जाणार्‍या मंगळाच्या उत्तरेकडील भागात रोव्हरने अनेक महिने घालवले. 2004 पासून रोव्हर मंगळाच्या मोहिमेवर आहे. त्यामुळे मंगळावर वसाहत स्थापन करण्याचे शास्त्रज्ञांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
छायाचित्रात कुठे काय? मंगळाचा उत्तर भाग हा या छायाचित्राचे मध्यवर्ती केंद्र आहे. किनार्‍यावर दक्षिणेतील भाग दिसत आहे. डावीकडच्या क्षितिजावर ‘रिच मॉरिस हिल्स’ आहेत. अंतराळ अभियांत्रिकीच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे.
खास वैशिष्ट्ये - ग्रीनली हेवनच्या (उत्तर भाग) जमिनीच्या काही भागावर धुळीची चादर अंथरलेली आहे. ग्रीनली हेवनचा उत्तर, नैर्ऋत्य आणि पूर्वेकडील भाग चमकदार आहे. मंगळ ग्रहाच्या अंतर्गत संरचनेच्या अध्ययनासाठी ध्वनी लहरींचे निरीक्षण करण्यात आले. या अध्ययनामुळे ग्रहाच्या भौगोलिक आणि रासायनिक स्थितीबरोबरच मिनरल्सचाही सविस्तर तपशील मिळणार आहे. मंगळावरील सर्वात मोठय़ा अँँडिव्हर क्रेटरची विस्तृत माहिती मिळते. ती आजपर्यंत मिळू शकली नव्हती.
पुढे काय? मंगळावरील मोहिमेवर माणूस पाठवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यो मोहिमेत मिळालेल्या माहितीचे अध्ययन करून नासा कारच्या आकाराचे रोव्हर यान तयार करून मंगळावर पाठवू शकते.