आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nasa: 3D Printing Will Enable 'Star Trek Replication'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नासाचा अंतराळात पहिला थ्री-डी प्रिंटर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने पुढील वर्षी थ्री-डी प्रिंटर अवकाशात पाठवण्याचा घाट घातला आहे. हा प्रिंटर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात काम करेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

थ्री-डी प्रिंटरचे सुटे भाग पृथ्वीपासून दूर अंतरावर तयार करण्याचीदेखील ही पहिलीच वेळ आहे. शून्य गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीत त्याची निर्मिती करण्यात आली आहे. स्थानकावरच त्याचे इतर भागही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गरजेच्या वेळी त्यांचा वापर करता येऊ शकतो, अशी माहिती अंतराळात तयार करण्यात आलेल्या या उपकरणाची उत्पादक कंपनीचे सीईओ अँरोन किमर यांनी सांगितले. सध्याच्या काळात सर्व प्रकारच्या अंतराळ मोहिमा पूर्णपणे पृथ्वीवर अवलंबून आहेत. कोणत्याही प्रकारचे वाहक यंत्राची निर्मितीदेखील पृथ्वीवरच केली जाते. नजीकच्या काळात अंतराळवीर साधनांचे मुद्रण करण्यास सक्षम होणार आहेत. अंतराळात अशा प्रकारची आवश्यकता असेल तेव्हा मुद्रण करणे शक्य होणार आहे. थ्री-डी प्रिंटरमुळे अंतराळ मोहिमांची विश्वासार्हता व सुरक्षितता या दोन्ही गोष्टी साध्य होणार आहेत.