आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'नासा'चे 'क्‍युरिओसिटी' मंगळावर उतरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ह्यूस्टन - मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या दृष्टीने मानवाने सोमवारी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. अमेरिकेचे क्युरिऑसिटी रोव्हर साडेआठ महिन्यांच्या प्रवासानंतर 570 दशलक्ष किलोमीटर अंतर कापून मंगळावर अलगद उतरले. गेल क्रेटर या नियोजित स्थळी उतरण्यासाठी रोव्हरने कूच केली तेव्हा ते 7 मिनिटे अहोरात्र पर्शिम करणार्‍या शास्त्रज्ञांसाठी हृदयाचे ठोके चुकवणारे होते. अखेर रोव्हर यशस्वीरीत्या पृष्ठभागावर उतरले आणि मोहिमेत सहभागी ‘नासा’तील शास्त्रज्ञांच्या आनंदाला भरते आले. अडीच अब्ज डॉलरच्या मोहिमेतील पहिली कसोटी शास्त्रज्ञांनी पार केली होती. काही मिनिटांतच रोव्हरने एक कृष्णधवल छायाचित्रही पाठवले. पुढील दोन वर्षांत हे यान मंगळाची रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न करील.
हा आहे उद्देश : जीवसृष्टीसाठी आवश्यक कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, ऑक्सिजन आणि पाणी मंगळावर आहे काय, याचा शोध हा मोहिमेचा हेतू.जीव, सूक्ष्मजीवाश्माचा शोध घेणारी यंत्रणा त्यावर नाही. यानाने आणलेल्या दगड, मातीचे परीक्षण प्रयोगशाळेत होणार आहे.
तीन वर्षांच्या किराण्यासह मंगळावर!
मंगळावर ‘मंगल’: नासाने जारी केली आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट छायाचित्रे!
मंगळावर पृथ्वीइतकेच पाणी;शास्त्रज्ञांनी केला दावा
मंगळावर आढळला लाव्हाचा प्रवाह
मंगळावर पाण्याचे अस्तित्व असणे म्हणजे सजीव असणारच!