आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nasa Deliberately Kept Kalpana Chawla, Other Astronauts In Dark About Impending Death

कल्पना चावलाची टीम वाचणार नसल्याचे नासाला ठाऊक होते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केनेडी स्पेस सेंटर (अमेरिका) - भारतीय वंशाची अंतराळ यात्री कल्पना चावला व तिच्या सहकार्‍यांचे पथक पृथ्वीवर सुरक्षित परत येऊ शकणार नाही, ही बाब नासाच्या मिशन कंट्रोल रूमला माहीत होती. परंतु अंतराळवीरांना ही बाब सांगण्यात आलेली नव्हती. अंतराळ यान कोलंबियाचे प्रोग्रॅम मॅनेजर राहिलेले वेन हेल यांनी या दुर्घटनेला 10 वष्रे पूर्ण झाल्यानंतर हा खुलासा केला आहे. अंतराळ मोहिमेवरून परत येताना 1 फेब्रुवारी 2003 रोजी अमेरिकेचे कोलंबिया हे यान दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यात कल्पना चावलासह सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याबाबत भाष्य करताना हेल यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिले आहे की, या यानात असा बिघाड निर्माण झाला होता की तो दुरुस्त होऊ शकत नव्हता. हे यान इंटरनॅशनल स्पेस सेंटरपासूनही बरेच दूर होते. त्यामुळे रोबोटिक आर्मद्वारे हा बिघाड दुरुस्त करणे शक्य नव्हते. अमेरिकन वृत्तवाहिनी एबीसीने दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक पातळीवर या मोहिमेतील त्रुटी मान्य करणारे हेल हे पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत.

चूक मान्य करणारे हेल पहिले - हेल यांनी म्हटले आहे की, मिशन मॅनेजमेंट टीमचे फ्लाइट डायरेक्टर जॉन हारपोल्ड यांनी या बिघाडावर चर्चा केली होती. त्यांचे म्हणणे असे होते की, ‘आम्ही टीपीएस थर्मल प्रोटेक्शन सिस्टिममध्ये निर्माण झालेला बिघाड कुठल्याही परिस्थितीत दुरुस्त करू शकत नाही. जर तो बिघडला असेल तर त्याच्या दुरुस्तीचा प्रयत्न न करणेच योग्य राहील. मला असे वाटते की कोलंबियाच्या चालक टीमला त्याबाबत सांगू नये. तुम्हाला असे वाटत नाही का, की त्यांनी या यात्रेचा प्रसन्न आणि यशस्वीरीत्या आनंद घ्यावा आणि वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करतेवेळी अचानक मृत्यूला त्यांनी आलिंगन द्यावे. न की त्यांना कक्षेबाहेर अंतराळात भरकटण्यास मजबूर करावे. ऑक्सिजन संपेपर्यंत ते काहीच करू शकणार नाहीत. जेव्हा की हे स्पष्ट झाले होते की शटल तुटून दोन भागात विभागले गेले आहे.’ फ्लाइट संचालक लेरॉन केन यांनी कार्यालयास कुलूप लावून सर्व कॉम्प्युटर डाटा सुरक्षित ठेवला होता.