आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवाच्‍या अस्तित्‍वासाठी मंगळावर अनुकूल परिस्थिती, नासाच्या यानाला सेंद्रिय द्रव्य आढळले, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नासाच्या क्युरिऑसिटी यानाला मंगळावर काही सेंद्रिय रेणू आढळले आहेत. हे रेणू कार्बन रेणू असल्‍याचा पुरावा क्‍युरिऑसिटी यानाने दिला असल्‍याचे संशोधकांनी म्‍हटले आहे. या घटकांचे विच्छेदन केल्यावर हे सेंद्रियच असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी मंगळावर अनुकूल परिस्थिती असल्याचे या पूर्वीही संशोधकांनी सिद्ध केले होते. या सेंद्रिय अणुमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन ही घटकद्रव्ये आहेत. या सेंद्रिय घटकांची निर्मिती रासायनिक प्रक्रियांमधून होण्याची शक्यता सॅम्पल अ‍ॅनालिसिस अ‍ॅट मार्स या संशोधक टीमने वर्तवली आहे. मंगळाच्या संशोधनात हे यश दिशादर्शक ठरेल.

क्युरिऑसिटी रेवरने पाठवलेली मंगळावरची छायाचित्रे पाहा पुढील स्‍लाईडवर...