आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासाच्या क्युरियासिटीने पाडले खडकाला छिद्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लंडन - अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाच्या क्युरियासिटी रोव्हरने मंगळ ग्रहाच्या खडकावर पहिल्यांदाच खोदकाम केले. रोव्हर खडकाचे तुकडे गोळा करणार आहे. या तुकड्यांच्या अभ्यासातून मंगळ ग्रहावर कधी काळी जीवसृष्टी होती का, याचा शोध केला जाणार आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात क्युरियासिटी ज्या गेल क्रेटर या ठिकाणी उतरले होते तेथील खडकावर क्युरियासिटी रोव्हरने रोबोटिक बाहुच्या साहाय्याने खोदकाम केले. क्युरियासिटीने पहिल्यांदाच खडक छेदण्यात यश मिळवले आहे. नासाचे अभियंता खडक छेदण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेत आहेत. प्रयोगासाठी वापरण्यात आलेल्या खडक योग्य वाटल्यास, त्यावर अनेक छेद घेतले जातील. त्याआधी खडकाचे पावडर सॅम्पल क्युरियासिटीच्या प्रयोगशाळेत पाठवले जातील. मंगळावर जिवाणूयोग्य वातावरण होते काय, याची शक्यता तपासण्यासाठी रोव्हर मोहीम आहे. गेल्या वर्षी 6 ऑ गस्ट रोजी क्युरियासिटी रोव्हरे मंगळावर उतरले.