आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीवरील मंगळमय सजीव शोधणार नासा, मंगळावरील परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - मंगळ ग्रहावर जीवांचा शोध घेत असलेले संशोधक आता पृथ्वीवरील मंगळावरील सजीवांसारख्या जीवांचा शोध घेणार आहेत. संशोधकांच्या मते, पृथ्वीवरील काही भाग मंगळ ग्रहासारखाच आहे. या अभ्यासामुळे मंगळावरील सजीवांची संभाव्यता शोधण्यासाठी मदत मिळू शकते. या अभ्यासकार्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारी नासा या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने उचलली आहे. लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार, संशोधक पृथ्वीवर मंगळाच्या तीन अवस्थांचा अभ्यास करतील. यातील पहिली अवस्था म्हणजे जेव्हा मंगळ ग्रह थंड, दमट आणि राहण्यायोग्य होता, दुसरी म्हणजे संक्रमण काळादरम्यान जेव्हा येथील पाणी संपले आणि तिसरी म्हणजे मंगळावरील वर्तमान शुष्क वातावरण होय.

असे केले जाईल संशोधन
या संशोधनासाठी कॅलिफोर्निया आणि येलोस्टोन राष्ट्रीय उद्यानातील उष्ण वसंत ऋतू, संपूर्ण बर्फाच्छादित आर्क्टिक आयलँड, ऑस्ट्रेलियातील काही प्राचीन टेकड्या आणि चिलीतील ज्वालामुखीपासून तयार झालेले सरोवर आणि तेथील मातीचा अभ्यास केला जाणार आहे. कॅलिफोर्नियाच्या माउंटेन व्ह्यूस्थित सेटी इन्स्टिट्यूटच्या वरिष्ठ वैज्ञानिक नताली कॅबरोल या संशोधन प्रकल्पाच्या प्रमुख आहेत. विविध टप्प्यांमध्ये मंगळावरील सजीवांच्या लक्षणांचा अभ्यास करता यावा यासाठी विविध वातावरणांची निवड करण्यात आल्याचे कॅबरोल यांनी म्हटले आहे. २०२० च्या मंगळ अभियानासाठी बनवण्यात आलेल्या उपकरणांचाच वापर या संशोधनासाठी केला जाणार आहे, असे नासाच्या सूत्रांनी सांगितले.