आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासाच्या नव्या रोबोटची चांदोबाला परिक्रमा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था, नासाच्या कारच्या आकारातील नव्या रोबोटने चंद्राला परिक्रमा घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे चंद्रावरील वातावरणासंबंधित प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.


लुनार अ‍ॅटमॉस्पियर अ‍ॅँड डस्ट एन्व्हायर्नमेंट एक्सप्लोरर (एलएडीईई) यान चंद्राच्या कक्षेत स्थिरावले. चंद्राच्या वातावरणाची रचना व पातळ पापुद्र्याचे छायाचित्र घेण्यासाठी ही मोहीम आहे. चंद्राच्या उच्च कक्षेत प्रवेश करण्यापूर्वी एलएडीईईने पृथ्वीची तीन वेळा लंबवर्तुळाकार कक्षेतून परिक्रमा केली. उच्च परिक्रमेदरम्यान चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव अस्तित्वात आला. यानंतर एलएडीईई चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी ‘बिग बर्न’ क्रिया पार पडली.