आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मंगळ ग्रहावर नासाचे ' मार्स रोव्हर' यान लॅडिंग करण्यापूर्वीच एक वाईट बातमी आली आहे. ६ ऑगस्टला हे यान मंगळावर उतरणार होते. परंतु मंगळावर धुळीचे वादळ आल्याने या अभियानात अडचण निर्माण होण्याची शक्यात आहे. परंतु नासाच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे धुळीच्या वादळामुळे जास्त फरक पडणार नाही.
'रोव्हर' हे एक मोटार चलित वाहन आहे. याचे मुख्य काम ग्रहाच्या पृष्ठभागावर चालत राहून आकडे गोळा करणे हे आहे. परंतु मंगळ ग्रहावर आलेल्या धुळीच्या वादळामुळे हे यान थोडे डगमगले आहे. त्यामुळे त्याने पाठवलेल्या आकड्यांमध्ये चुका वाढण्याची शक्यता आहे.
नासाचे आतापर्यंतचे सर्वात मोठे रोव्हर ‘क्युरिऑसिटी’ सहा ऑगस्टला मंगळ ग्रहावर उतरणार आहे. २०११ मध्ये या यानाचे प्रक्षेपण केले गेले होते. हे यान मंगळावर २ वर्ष राहणार असून येथील खड्यांचा अभ्यास करणार आहे. एवढेच नाही तर, हे यान मंगळावर पाण्यासह जीवनासाठी इतर घटकांचा शोध घेणार आहे. या यानाला मंगळाच्या पृष्ठभागावर रॉकेटने चालणारी ‘स्काय क्रेन’ उतरवेल.
मंगळावर पृथ्वीइतकेच पाणी;शास्त्रज्ञांनी केला दावा
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.