आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NAT GEO CONTEST 2014: पाहा, जगभरातून आलेले 21 आकर्षक फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - सध्या नॅशनल जिओग्राफीक ट्रॅव्हलर फोटो कॉन्टेस्ट -2014 चालू आहे. म्हणजेच आता पुन्हा एकदा ट्रॅव्हलिंग दरम्यान काढण्यात आलेले फोटो पाहाण्याची संधी मिळणार आहे. हे फोटो जगभरातील शौकीन तसेच व्यावसायिक फोटोग्राफर्सने काढलेले आहेत. कॉन्टेस्टमध्ये सहभागी होणार्‍या सर्वच फोटोग्राफर्सचे फोटो तुम्ही नॅशनल जिओग्राफीकच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता.

हे कॉन्टेस्ट या महिन्याच्या शेवटपर्यंत चालणार आहे. कॉन्टेस्टमध्ये तीन कॅटेगरींचा (पीपल, प्लेस आणि नेचर) पर्याय ठेवण्यात आला आहे. या कॉन्टेस्ट-2014 च्या विजेत्याला 2,500 डॉलर म्हणजेच 1,54,000 रुपये दिले जातील. तसेच ग्रँड प्राईज विनरला 7,500 डॉलर म्हणजेच जवळपास 4,62,000 रुपये. त्याशिवाय वॉशिंग्टन डीसीचा टूर हा बक्षिसाच्या स्वरूपात देण्यात येणार आहे.

वॉशिंग्टन डीसी टूरच्या माध्यमातून फोटोग्राफरला नॅशनल जिओग्राफीकच्या वार्षिक फोटो सेमिनारमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. चला तर पाहूयात, या कॉन्टेस्टमध्ये पाठवण्यात आलेले काही फोटो...

पुढील स्लाईडमध्ये पाहा, निवडक फोटो...