(अमेरिकेत आलेल्या वादळादरम्यान जुलेसबर्ग येथे काढण्यात आलेला फोटो. या फोटोला स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे.)
नॅशनल जिओग्रॅफीक पब्लिकेशन नेहमीच आपल्या उत्कृष्ट फोटोंसाठी ओळखले जाते. नुकतेच घेण्यात आलेल्या फोटो कॉन्टेस्ट ट्रॅव्हेलरचे निकाल जाहिर झाले आहे, ज्यामध्ये जगभरातून आलेल्या 18000 फोटोंमधून 10 सर्वोत्कृष्ट फोटोंना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये निवडलेले फोटो अत्यंत सुंदर जागांवर आणि वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतीचे दर्शन घडवतात. पहिले बक्षीस वादळ येण्यापूर्वी घेण्यात आलेल्या फोटोला मिळाला आहे. हा फोटो अमेरिकेच्या टोर्नेडो वादळादरम्यान जुलेसबर्ग येथे काढण्यात आला आहे.
ऑस्ट्रीयाचे ग्रीन लेक, जेरूसलेममध्ये लग्नानंतरची जोडी, चेक रिपब्लिक येथील एक छोटी वाडी असे अनेक दृश्य दाखवणार्या या फोटोंनी या स्पर्धेच्या विजेत्यांच्या यादीत आपले नाव नोंदवले. या स्पर्धेत चार वेगवेगळ्या प्रकारात जगभरातून फोटो आले होते. ज्यामधील सर्वात उत्कृष्ट फोटोंना परिक्षकांच्या एका टीमने निवडले आहे.
या 10 विजेत्यांमधील 3 जणांना विशेष बक्षीस देण्यात आले आहे. पहिल्या क्रमांकाचा फोटोग्राफर मार्को कोरोएक याला नॅशनल जिओग्राफीकच्या शोध अभियानांतर्गत 8 दिवसांच्या अलास्का टूरवर जाण्याची संधी मिळाली आहे. तर या स्पर्धेतील इतर सात विजेत्यांना 200 डॉलरची भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यासोबतच ऑर्ट ऑफ ट्रॅव्हल फोटोग्राफी कोर्सची डीव्हीडीही देण्यात आली आहे.
पुढे पाहा, स्पर्धेत विजेता ठरलेले इतर 9 फोटो