आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंचे प्रकरण मिटले, कोकणात ‘चांगले वारे’; मराठवाड्यातही पोहोचणार- अशोक चव्‍हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- नारायण यांचे प्रकरण सामोपचाराने मिटले हे काँग्रेस पक्षासाठी शुभसंकेत आहेत, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दिली. नारायण राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याबाबत गेल्या 15 दिवसांपासून अनेक वावड्या उठत होत्या. अनेकांनी अनेक अंदाज बांधले; परंतु हवामान खात्याचा अंदाज चुकीचा निघाला. कोकणात आता चांगले वारे वाहू लागलेत. राज्यात पावसाची सुरुवात नेहमी कोकणापासून होते.
त्यानंतर तो मराठवाड्यात येतो. आता हे चांगले वारे मराठवाड्यात वाहू लागतील, असेही अशोक चव्हाण मिश्किलीने म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामागे माजी खासदार भास्करराव पाटील यांच्या काँग्रेस सोडण्याचा निर्णयाचा संदर्भ असू शकतो, असा तर्क लावला जात आहे.