आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nation's Granny: Diamond Jubilee Marks Queen Elizabeth Ii's Extraordinary 60 year Reign

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटीश महाराणीपदाला 60 वर्षे पूर्ण, विकेण्डच्या सुट्टय़ांमध्ये वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटीश महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राज्याभिषेकाला शनिवारी 60 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ब्रिटनमध्ये डायमंड ज्युबिली समारंभ साजरा केला जात आहे. यासाठी विकेण्डच्या सुट्टय़ांमध्ये वाढ करण्यात आली आहे. 2 ते 5 जून याकाळात सरकारी कार्यालये बंद असतील.

एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक 2 जून 1953 मध्ये झाला होता. त्यांची कारकिर्द सर्वाधिक काळ असल्याबद्दल ब्रिटन नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. . रविवारी थेम्स नदीवरून एक हजार नावांचा जत्था जाईल. प्रत्येक नावेवर काही ना काही खास असेल. त्यात र्शी मुक्ताजीवन पाईप बँड व र्शी मुक्ताजीवन ढोल अकादमीची टीमही असेल. ही टीम भारतीय संगीत सादर करणार आहे. नदीच्या किनार्‍यावर 56 जहाज तैनात केले जाणार आहेत.
सहा दशकाच्या सहा गोष्टी

> महाराणीला आपल्या कारकिर्दीत 4 लाख 4 हजार पुरस्कार व सन्मान मिळाले. यात अनोख्या भेटवस्तूंचाही समावेश आहे. उदाहरण- ब्राझीलकडून काही प्राणी मिळाले.

> महाराणीने पहिला इ-मेल 1976 मध्ये ब्रिटीश लष्कर तळावर पाठवला होता. ट्विटरमधून 2009 तर फेसबुक नोव्हेंबर 2010 मध्ये जोडल्या गेल्या. डिसेंबर 2007 मध्ये यू-ट्यूबवर रॉयल चॅनेल सुरू.

> महाराणी या ब्रिटनच्या एकमेव शासनकर्त्या आहेत. ज्या नंबर प्लेट विना कार चालवू शकतात. त्यांना परवान्याची गरज नाही.

> महाराणींनी आपला जास्त प्रवास शाही नौका ब्रिटानियातूनच केला आहे. 1954 ते 1997 पर्यंत या नौकेने सुमारे 16 लाख किमीचा प्रवास केला आहे.

> महाराणीचा खरा जन्मदिवस 21 एप्रिल आहे. परंतु त्याला अधिकृत पातळीवर जूनमध्ये मानले गेले. त्यांना फोटोग्राफीचा छंद आहे.

>महाराणीला अधिकृत पोट्रेटसाठी 129 वेळा बसावे लागले आहे.