आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या राज्याभिषेक षट्यब्दीपूर्ती सोहळ्यास शनिवारी ब्रिटनमध्ये धूमधडाक्यात सुरुवात झाली. एप्सम येथील घोड्यांच्या डर्बी शर्यतीला हजेरी लावून महाराणीने सोहळ्याचा शुभारंभ केला. निळ्या रंगाचा कोट, निळी टोपी परिधान केलेली महाराणी, पाठीमागे पती प्रिन्स फिलिप. एप्सम डर्बी शर्यतीसाठी महाराणीचे आगमन होताच लंडन, एडिनबरो, कार्डिफ, बेलफास्ट येथे एकाच वेळी तोफांची सलामी देण्यात आली. दक्षिण लंडनच्या बॅटरसी येथील रहिवाशांनी जंगी अंगत-पंगत आयोजित केली होती.
4 दिवस चालणार हा सोहळा
4 दिवस सार्वजनिक सुटी
62 तोफांची सलामी जगप्रसिद्ध टॉवर ब्रिज समोर देण्यात आली.
2200 दिवे ब्रिटनभर लावण्यात येणार आहेत.
नुकतेच लग्न झालेल्या केट-विल्यमची मुलगी होणार इंग्लंडची भावी \'राणी\'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.