आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navy SEAL Who Killed Bin Laden Breaks His Silence

लादेनला मारणा-या 'सील' कमांडोला सतावतेय भविष्‍याची चिंता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्‍टन- अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला ठार मारणा-या अमेरिकी नेव्ही सील कमांडोला भविष्‍याच्‍या चिंतेने त्रस्‍त केले आहे. मायदेशात भवितव्‍य धूसर असल्‍याची भावना या कमांडोनी व्‍यक्त केली आहे. लादेनला 3 गोळ्या घालून ठार मारणारा हा कमांडो निवृत्त झाला असून सर्वसामान्‍य नागरिक म्‍हणून जगताना आर्थिक संकटाचा त्‍याला सामना करावा लागत आहे.

एका मॅगझिनला दिलेल्‍या मुलाखतीत या कमांडोने या भावना व्‍यक्त केल्‍या आहेत. नाव न छापण्‍याच्‍या अटीवर त्‍याने ही मुलाख दिली आहे. अमेरिकेचा मोस्‍ट वॉन्‍टेड ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या नेव्ही सील्स कमांडो पथकाने 2 मे 2011 रोजी पाकिस्तानमधील अबोटाबाद येथे केलेल्या कारवाईत ठार मारले होते. कारवाईमध्‍ये या कमांडोने स्‍वतःची भूमिका उघड करतानाच स्‍वतःच्‍या कुटुंबाविषयी चिंता व्‍यक्त केली आहे.