आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nawaz Sharif Again Agressive On Kashmir Issue, Invite India For Resolution

नवाझ शरीफ यांचा पुन्हा काश्‍मीरचा राग, तोडगा काढण्‍यासाठी भारताला निमंत्रण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फराबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पुन्हा काश्मीरचा राग आळवून तोडगा काढण्यासाठी भारताला चर्चेचे निमंत्रणही देऊन टाकले. पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबाद येथे असेंब्लीच्या विशेष अधिवेशनात ते बोलत होते. सन 1990 पासून दरवर्षी 5 फेब्रुवारी रोजी काश्मीर एकता दिवस साजरा केला जातो.
काश्मीरप्रश्नी सविस्तर बोलणीसाठी भारताला निमंत्रण देऊन ते म्हणाले, काश्मीरप्रश्नी तोडगा निघत नाही तोपर्यंत या प्रदेशात संघर्ष आणि अनिश्चिततेचे वातावरण राहील. काश्मिरी नागरिकांच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. शरीफ यांनी भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती, परंतु आता ते आझाद काश्मीरच्या नावाखाली लढणा-या दहशतवाद्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणत आहेत व त्यांना नैैतिक, आर्थिक मदत करण्याच्या गोष्टी करीत आहेत. काश्मीरच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी पाकिस्तान रचनात्मक भूमिका अदा करेल, असे ते म्हणाले. सन 1990 पासून दरवर्षी पाकिस्तानात काश्मीर एकता दिन पाळला जातो. या दिवशी सार्वजनिक सुटी असते. जम्मू-काश्मिरात भारतीय लष्कराशी लढताना शहीद होणा-या सैनिक व दहशतवाद्यांच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.
जमातची भारतविरोधी निदर्शने
काश्मीर दिनानिमित्त जमात -उद - दवा या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये भारतविरोधी निदर्शने केली. काश्मिरात भारत सरकारविरोधात लढणा-यांना पूर्ण पाठबळ देण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. जमातचा म्होरक्या हाफीज सईद हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे.