आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nawaz Sharif Aided 6 Crores To Toyaba For Attack Of 26 11 On Mumbai

मुंबईवरील 26/11 हल्ल्यासाठी नवाझ शरीफ सरकारची तोयबाला 6 कोटींची मदत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - 2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट करणा-या लष्कर-ए-तोयबासाठी पाकिस्तानातील पंजाब सरकारने 6 कोटी 10 लाख रुपयांची मदत केली आहे. पंजाबमध्ये पंतप्रधान नवाज शरीफ यांचा
पीएमएल-एन हा पक्ष सत्तेवर असून शरीफ यांचे बंधू शाहबाज हे मुख्यमंत्री आहेत.

लष्कर-ए-तोयबावर बंदी घातल्यानंतर जमात-उद-दवा नावाने कार्यरत आहे. जमात उद-दवाच्या मर्कज-ए-तैयबा या केंद्रासाठी या निधीची 2013-14 या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारने नॉलेज पार्क स्थापन करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी सुमारे 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प मर्कज -ए-तैयबा केंद्राच्या परिसरात उभारण्यात येणार आहे. पंजाबच्या विधानसभेत सोमवारी हा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. लाहोरजवळील मुरिडके भागात नॉलेज पार्क उभारण्यात येणार आहे, असे अर्थमंत्री मुज्ताबा शुजौर रहेमान यांनी जाहीर केले.