आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nawaz Sharif Calls For Talks With Militants, Good Links With Neighbours

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकचा डबल गेम!, एकीकडे म्‍हणतात, मुद्दे शांततेने सोडवू अन् दुसरीकडे भारत विरोधी ठराव मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानने भारताविषयी गुरुवारी पुन्हा आपली दुटप्पी भूमिका दाखवून दिली. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तान भारतासोबतचे सर्व प्रलंबित मुद्दे शांतता मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करेल, असे स्पष्ट केले. त्याचवेळी देशाच्या नॅशनल असेंब्लीमध्ये भारताच्या विरुद्ध ठराव मांडण्यात आला. नियंत्रणरेषेवरील भारताच्या आक्रमक कारवाईबद्दल ठरावातून टीका करण्यात आली. बुधवारी भारतीय जवानांच्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत पाकिस्तानचा कॅप्टन ठार झाला होता.

सरहद्दीवर सातत्याने कुरापती काढणा-या पाकिस्तानने आपली चूक मान्य करण्याऐवजी उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. देशाचे कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीमध्ये गुरुवारी भारतविरोधी ठराव मंजूर करण्यात आला. भारताकडून सरहद्दीवर आक्रमकता वाढली आहे, असा आरोप केला आहे आणि पुन्हा दोन्ही देशांनी रचनात्मक पातळीवर परस्पर सहकार्य वाढवण्याचा उपदेशही करण्यात आला आहे. संरक्षणमंत्री राणा तन्वीर यांनी हा ठराव मांडला होता. सरहद्दीवर भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचा एक कॅप्टन ठार झाला होता. कॅप्टन सरफराज खान असे ठार झालेल्या कॅप्टनचे नाव आहे. त्यावर सभागृहात हा ठराव मांडण्यात आला होता. ठरावाच्या वेळी सरहद्दीवर शस्त्रसंधीचे अनेकवेळा उल्लंघन झाले आहे. त्याबद्दल तन्वीर यांनी सभागृहात चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर खान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

व्यूहरचनेसाठी बैठक
गुरुवारी कॅबिनेटच्या संरक्षणविषयक समितीच्या बैठकीत सरहद्दीवरील गोळीबाराची चर्चा झाली. भारतासोबतचे सर्व प्रलंबित प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी चर्चा करण्यात येईल, नियंत्रण रेषेचे कोणत्याही परिस्थिती पालन केले जाईल, असे नवाझ शरीफ यांनी स्पष्ट केले.