आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nawaz Sharif Did Not Gave Promise About Hafiz Saeed

हाफिज सईदबाबत आश्वासन; शरीफ यांची टाळाटाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- 26 / 11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला पकडण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना कसलेही ठोस आश्वासन दिले नाही.

ओबामा यांच्यासोबत 23 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत शरीफ यांनी सईदला पकडण्याबाबत कसलेही ठोस आश्वासन दिले नाही. बैठकीत आणि अँड्र्यूज हवाई तळावर जाण्यापूर्वी शरीफ यांनी ओबामा यांना ‘आपल्या भूमिकेवर ठाम ’ आणि ‘कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ’ असा ताठरपणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. सईदवर कडक कारवाई करण्यासंदर्भात नवीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, याची कल्पना ओबामा प्रशासनास असल्याचे सूत्रांनी सांगितले. दहशतवादाच्या विरोधातील लढाईत अमेरिकने पाकिस्तानला सहकार्य करण्याची वारंवार मागणी केली आहे. त्यानुसार पाकिस्तानकडून प्रतिसाद मिळेल, असे अमेरिकेला वाटत, परंतु बैठकीत तसा कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

शरीफ यांनी ओबामा यांना ठोस आश्वासन दिले नाही.
सईद जमात-उद-दवा संघटनेचा म्होरक्या आहे. त्याच्या संघटनेशी संबंधित अतिरेकी पंजाब प्रदेशात कारवाया करतात. सईद 26 / 11 च्या हल्ल्याचा सूत्रधार आहे. त्याचबरोबर तो अमेरिकेच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीतदेखील आहे. अमेरिका आणि भारताला हवा असतानाही सईद पाकिस्तानात मात्र मुक्तपणे फिरतो.


पाकिस्तानवर निगराणी
सईदच्या दहशतवादी कारवायासंबंधीच्या हालचालींवर अमेरिकेने बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. जमात-उद-दवा संघटनेवरदेखील अमेरिकेची निगराणी सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.