इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळामधील काही मंत्री, उच्चस्तरीय सरकारी अधिकाऱ्यांविरोधात हत्येच्या आरोपाखाली बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. इस्लामाबादमध्ये सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या निदर्शकांची हत्या करण्यात आल्यासंदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शरीफ व इतरांविरोधात आंदोलकांची हत्या केल्यासंदर्भातील तक्रार नोंदवण्याचा आदेश येथील जिल्हा न्यायाधीशांनी दिल्यानंतर ही तक्रार नोंदवण्यात आली. शरीफ यांच्याविरोधातील हत्येची ही दुसरी तक्रार आहे. ही तक्रार नोंदवण्यासाठी पाकिस्तान अवामी तेहरिक पक्षाचे नेते मौलवी ताहिर-उल- कादरी यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. यासंदर्भात पाकिस्तानी कायद्यानुसार हेतुपूर्वक हत्या व दहशतवादविरोधी कायद्यामधील कलमही शरीफ यांच्याविरोधात लावण्यात आले आहे. सोमवारी जिल्हा न्यायालयाने आदेश िदल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात अाली अाहे.