आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलालाच्या नोबेल समारंभात नवाझ शरीफांची गैरहजेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - नोबेल शांतता पुरस्कार समारंभात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वर्षीचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार बाल हक्कांसाठी काम करणारे भारतातील कैलाश सत्यार्थी आणि मुलींच्या शिक्षणासाठी लढणा-या पाकिस्तानी मलाला युसूफझई हिला संयुक्त स्वरूपात जाहीर झाला आहे.

द नेशन या वृत्तपत्रानुसार, १० डिसेंबर रोजी ओस्लो येथे आयोजित एका समारंभात मलालास हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, रविवारी पाकिस्तानातील पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अजीज यांनी सांगितले की, या दिवशी नवाझ शरीफ यांचा अधिकृत चीन दौरा यापूर्वीच निश्चित झालेला आहे.
या कार्यक्रमात मलाला आणि सत्यार्थी हे पाकिस्तान आणि भारतातील आपापल्या कार्याचा तसेच आपल्या संघर्षातील अनुभव कथन करतील. नॉर्वेमधील नोबेल समितीने १० ऑक्टोबर दोघांना या वर्षीचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर केला आहे.