न्यूयॉर्क - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अमेरिकेत पोहोचताच
आपल्याविरुद्ध सुरू असलेले आंदोलन किरकोळ ठरवले. शरीफ म्हणाले, पाकिस्तानचे सर्व राजकीय पक्ष लोकशाही बळकट करण्यामध्ये गुंतले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण देण्याआधी ते पाकिस्तानी अमेरिकी समुदायासमोर बोलत होते. ते म्हणाले, काही लोक महत्त्वाकांक्षेतून सरकारविरोधात निदर्शने करत होते. मात्र, लोकांनी त्यांना पाठिंबा दिला नाही.
संसद भवन आणि पाकिस्तान टीव्ही नेटवर्कवर झालेल्या हल्ल्याच्या घटना देशाच्या इतिहासात सापडत नाहीत. शरीफ यांना अपात्र ठरवणा-या याचिकेवर २९ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.